महात्मा गांधी यांचा वध, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य

महात्मा गांधी यांचा वध की हत्या यावरून हिंदूत्ववादी संघटना आणि काँग्रेस नेहमी आमने-सामने येत असतात. त्यातच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीच महात्मा गांधी यांच्या हत्येऐवजी वध असा शब्द वापरला आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.;

Update: 2023-04-10 10:13 GMT

महात्मा गांधी यांचा वध की हत्या यावरून हिंदूत्ववादी संघटना आणि काँग्रेस नेहमी आमने-सामने येत असतात. त्यातच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीच महात्मा गांधी यांच्या हत्येऐवजी वध असा शब्द वापरला आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

पृथ्वीराज चव्हाण(Prithviraj Chavan) हे जिन महाविर ज्ञान विज्ञान कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमात बोलत असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचा वध केला, असं वक्तव्य केलं आहे.

यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, तुषार गांधी यांना यंदाचा पुरस्कार देण्यात आला आहे. तुषार गांधी यांनी महात्मा गांधी यांच्यावर पुस्तकं लिहीली आहेत. यातील एका पुस्तकात तुषार गांधी (Tushar Gandhi) यांनी महात्मा गांधी यांच्या वधाच्या आधीचा इतिहास सविस्तर मांडला आहे. त्यामध्ये महात्मा गांधी यांचे तत्व विस्तृतपणे सांगितले आहे. मात्र महात्मा गांधी यांचा वध केल्याचं वक्तव्य केल्यानंतर मॅक्स महाराष्ट्रने ज्येष्ठ इतिहास संशोधक राम पुनियानी (Ram Puniyani) यांच्याकडून हत्या आणि वध या शब्दांबाबत जाणून घेतलं.

त्यामध्ये वध हा राक्षसांचा किंवा दुष्टांचा वध अशा अर्थाने वापरला जातो. मात्र महात्मा गांधी यांची एका माथेफिरुने हत्या केली आहे. त्यामुळे महात्मा गांधी यांची हत्याच झाली आहे. मात्र अशा पध्दतीने कुणी महात्मा गांधी यांचा वध केला म्हणत असेल तर तो राष्ट्रपित्याचा अपमान आहे. त्यामुळे जबाबदारीने बोलायला हवं, असं मत राम पुनियानी यांनी व्यक्त केलं.

यानंतर मॅक्स महाराष्ट्रने पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बातचीत केली. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले की, माझ्याकडून चुकून हत्येऐवजी वध असा शब्द केला. महात्मा गांधी यांची हत्याच झाली आहे, वध नाही.

पृथ्वीराज चव्हाण यांनी महात्मा गांधी यांचा वध झाला असल्याचं वक्तव्य केल्यानंतर त्यांच्या तोंडी ही आरएसएसची भाषा आल्याचं म्हटलं जात आहे. मात्र आता याबाबत आपल्याकडून चुकून हे वक्तव्य गेल्याचं सांगत पृथ्वीराज चव्हाण यांनी यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

Tags:    

Similar News