आज झालेल्या मोदी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात डॉ. भारती पवार यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
कोण आहेत भारती पवार?
डॉ भारती पवार महाराष्ट्र च्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदार संघाचं प्रतिनिधीत्व करतात. दिंडोरी मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी आरक्षीत मतदारसंघ आहे. डॉ. भारती पवार पेशानं वकील आहेत. त्या एमबीबीएस डॉक्टर आहेत. त्यांनी राष्ट्रवादीतून 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या 2019 ला आदिवासी बहूल दिंडोरी मतदार संघातून लोकसभा निवडणूक जिंकल्या आहे.
महाराष्ट्रातून मोदी सरकारच्या नवीन मंत्रीमंडळात नारायण राणे, कपिल पाटील, डॉ भारती पवार, डॉ भागवत कराड यांना स्थान देण्यात आले आहे.