मोदी मंत्रीमंडळात आयारामांना संधी, महाराष्ट्रातील 4 मंत्र्यांपैकी 3 कॉंग्रेस राष्ट्रवादीतून आलेले...
आज मोदी सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाला. या मंत्रीमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून नारायण राणे, कपिल पाटील, डॉ भारती पवार, डॉ भागवत कराड, यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे.
मात्र, या 4 मंत्र्यांमध्ये 3 मंत्री कॉंग्रेस राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेले आहेत.
नारायण राणे: नारायण राणे यांचा प्रवास शिवसेना कॉंग्रेस आणि भाजप असा राहिलेला आहे. नारायण राणे यांनी कॉंग्रेसमधून 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी 2005 मध्ये शिवसेनेला राम राम करत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
डॉ. भारती पवार: दिंडोरी मतदारसंघातून खासदार असणाऱ्या डॉ. भारती पवार यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या पेशाने डॉ. आहेत.
कपील पाटील: कपील पाटील यांची दुसरी टर्म आहे. कपील पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून 2014 ला भाजपमध्ये प्रवेश केला होता. ते भिवंडी लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात.
भागवत कराड हे गोपिनाथ मुंडे यांचे विश्वासू मानले जातात. वंजारी समाजातून येणारे भागवत कराड हे एकमेव भाजपचे नेते आहेत. ज्यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला आहे.
एकंदरीत वरील 4 मंत्र्यांपैकी 3 मंत्री कॉंग्रेस राष्ट्रवादीतून आलेले आहेत.