आज मोदी सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार होत आहे. आज झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात खासदार नारायण राणे यांच्यासह महाराष्ट्रातून कपील पाटील यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. कपील पाटील हे महाराष्ट्रातून भिवंडी लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात.
महाराष्ट्रातून मोदी सरकारच्या नवीन मंत्रीमंडळात नारायण राणे, कपिल पाटील, डॉ भारती पवार, डॉ भागवत कराड यांना स्थान देण्यात आले आहे.