डॉ. हर्षवर्धन, रवी शंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर... मोदी सरकारमधून आऊट झालेले ते 13 बडे मंत्री

Update: 2021-07-07 15:19 GMT

गेल्या अनेक दिवसांपासून ज्या मोदी सरकारच्या मंत्रीमंडळाच्या विस्ताराची चर्चा होती. तो अखेर आज पार पडला. आगामी विधानसभा निवडणूका आणि जातीचं समीकरण लक्षात घेता, मोदी सरकारने आपल्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल केले आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया, अनुप्रिया पटेल यांच्यासारख्या युवा चेहऱ्यांची एंट्री दिली असली तरी मोदी यांनी 13 मोठ्या चेहऱ्यांना बाजूला केलं आहे. कोण आहेत हे मंत्री?

थावरचंद गेहलोत, सामाजिक न्यायमंत्री होते.

डॉ. हर्षवर्धन, केंद्रीय आरोग्य मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळत होते.

रवी शंकर प्रसाद, कायदा मंत्री म्हणून काम पाहत होते.

प्रकाश जावडेकर, पर्यावरण मंत्री या पदावर होते.

बाबुल सुप्रियो, पर्यावरण राज्यमंत्री होते.

रावसाहेब दानवे: महाराष्ट्रातून केंद्रीय राज्य मंत्री पदाची जबाबदारी सांभाळत होते. ते जालना लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात.

देबोश्री चौधरी: महिला व बालकल्याण मंत्रालयाचे त्या राज्यमंत्री होत्या.

रमेश पोखरियाल निशंक: मानव संसाधन विकास मंत्री या पदावर होते.

सदानंद गौडा: केंद्रीय मंत्रीपदावर होते. मात्र, कोरोना काळात औषधांच्या कमतरता जाणवली. त्याचं खापर त्यांच्यावर फोडण्यात आलं आहे.

संतोष गंगवार: रोजगार मंत्री होते. कोरोना काळात भाजप सरकारची टीका करणारी एक चिठ्ठी व्हायरल झाली होती.

संजय धोत्रे: केंद्रामध्ये शिक्षण खात्याचे राज्यमंत्री होते.

रतनलाल कटारीया: जलशक्ती मंत्रालयाचे राज्यमंत्री होते.

प्रताप सारंगी: लघू व मध्यमं उद्योग मंत्रालयाचे राज्यमंत्री होते.

एकंदरींत या सर्व मंत्र्यावर मोदी नाराज होते. त्यामुळे मोदी यांनी या मंत्र्यांचे राजीनामे घेतले आहेत.

Tags:    

Similar News