VIDEO: 'करावे तसे भरावे', अनिल देशमुखांच्या कारवाईवर नारायण राणेंचा टोला
आज सकाळ माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ED ने छापे टाकले. त्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी ही कारवाई राजकीय नसल्याचा दावा केला असून 'करावं तसं भरावं' लागतं असं म्हणत या कारवाईचं समर्थन केलं आहे.
दरम्यान आज सकाळी ईडीने अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूरमधील घरांवर छापा टाकला. आज (25 जूनला) सकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. 7 ते 8 अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. इडीने केलेल्या या छाप्यानंतर अनिल देशमुख यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना पुन्हा माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले... पाहा काय म्हटलंय अनिल देशमुख यांनी
काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर त्यांच्यावर मनी लॉन्डरिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्याआधी सीबीआयनेही देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईतील बार आणि हॉटेल चालकांकडून 100 कोटी रुपये गोळा करुन आणण्याचे आदेश देशमुख यांनी सचिन वाझेला दिले होते, तसेच पोलिसांच्या बदल्यांमध्येही देशमुख यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप परबमीर सिंग यांनी केला होता. त्यानंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल होता.