नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान मिळणार असल्याचं वृत्त आहे. यासाठी नारायण राणे स्वत: दिल्लीत दाखल झाले आहेत. मोदी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. या चर्चेत महाराष्ट्रातून नक्की कोणाला संधी दिली जाणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्रातून काही नावं चर्चेत आहेत. त्यामध्ये नारायण राणे यांचं नाव आघाडीवर आहे. तसंच खासदार प्रीतम मुंडे, खासदार हिना गावीत यांच्यासह खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार भारती पवार ही नाव आघाडीवर आहेत.
मंत्रीपद मिळण्याच्या शक्यतेने नारायण राणे दिल्लीत दाखल झाले आहेत. या संदर्भात राणे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता नारायण राणे यांचं यादीत नाव आहे. मात्र, अद्यापपर्यंत निश्चित झालं नसल्याचं राणे यांनी स्वत: सांगितलं आहे.
दरम्यान दिल्लीत दाखल झालेल्या राणे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता राणे यांनी
मी खासदार आहे. मला दिल्लीत यावंच लागतं. आता अधिवेशनाच्या अगोदर आम्ही लोक इकडं येत असतो.
यावर पत्रकारांनी 15 दिवस अगोदर यावं लागतं.
विशेष काही असेल तर नक्की सांगेल. तुमच्यापासून काही कोणी लपवू शकतं का? काही वेळ मला द्या. मला घरी जाऊ द्या. त्यानंतर मी बोलेल.
त्यानंतर पत्रकारांनी मंत्री पदाच्या यादीत तुमचं नाव आहे. असं म्हटल्यावर राणे यांनी नाव आहे पण निश्चित होऊ द्या. असं म्हणत राणे यांनी पत्रकारांना टाळलं.
मंत्रीमंडळ विस्तारात देवेंद्र फडणवीस यांचं देखील नाव चर्चेत होतं. मात्र, स्वत: फडणवीस यांनी मंत्री पद नाकारल्याची चर्चा आहे.