लोकशाही या मराठी वृतवाहिनीने भाजपचे माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांचा सहभाग असलेला अश्लील व्हिडिओ चॅट बातमी स्वरूपात प्रसिद्ध केलंय. किरीट सोमय्यांच्या या कथित आक्षेपार्ह अवस्थेतील नागड्या उघड्या कथित व्हिडीओ क्लिपमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. सोमय्या यांच्या अशा प्रकारच्या काही डजन कथित व्हिडीओ क्लिप्स असल्याचा दावाही या वृत्तवाहिनीने केलाय. अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे, कागदपत्रे माध्यमांसमोर वजनावर मोजून सांगणाऱ्या सोमय्या यांच्या कथित व्हिडीओ क्लिप्स डजनावर मोजण्याची वेळ माध्यमांवर आलीय.