माझ्या मुलांना आणि नवऱ्याला प्रसिध्दीची आवड नाही, तरी... सुप्रिया सुळेंनी जाहीर व्यक्त केली खंत
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या लोकसभा मतदारसंघाचा दौरा करत आहेत. पवार कुटुंबाविषयी सध्या ज्या उलटसुलट बातम्या येत आहेत त्यावरुन सुप्रिया सुळेंनी खंत व्यक्त केली आहे. मागच्या सव्वा वर्षापासून मी काही सहन करत आली आहे ते इतर कुणीही सहन करून दाखवावं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. पुण्यात भोर याठिकाणी असलेल्या कार्यक्रमात सुप्रिया सुळेंनी हे वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
या कार्यक्रम प्रसंगी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मागच्या सव्वा वर्षापासून मी काही सहन केलं आहे, ते इतर कुणीही सहन करून दाखवावं. माझ्या पोरांना पण सोडलं नाही. माझ्या पोरांचा राजकारणाशी संबंध काय, माझ्या मुलांना आणि नवऱ्याला प्रसिध्दी आवडतात नाही. रोज आमच्या कुटूंबाबत काही ना काही तरी बोललं जातं आहे, लिहिलं जात आहे. आधी खूप वाईट वाटायचं मागचं दिड वर्ष आमच्या घराबाबत हे सगळं चाललं आहे. अशी खंत सुप्रिया सुळेंनी आपल्या भाषणात बोलून दाखवली.
जे काही बोललं जातं त्याची रेकॉर्डींग करतात, त्यामूळे आज काळ मनमोकळं भाषणंच करू शकत नाही. मला काही भाजपचे नेते मंडळी भेटले होते. ते म्हणाले, काय केलंय तुम्ही पवार कुटुंबियाने? असा एखादा दिवस जात नाही ज्या दिवसी तुमच्याबद्दल टि.व्ही. वर काही नसतं. आम्ही पॅकेज घेऊन थकलो, आणि तुमचं मोफत चालू आहे. त्यामुळे आता सगळ्यांच्या घरात पोहचतोय. घरातले सगळे पुरूष दाखवत आहेत आमच्या, महिलांवर अन्याय होतोय, त्यांचेही फोटो लावा. अशी खुमासदार टिकाही सुप्रिया सूळेंनी यावेळी केली.