मुंबई(Mumbai) : आज महाविकास आघाडीची मुंबईमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीत जागा वाटपासंदर्भात महत्वाची चर्चा होणार असल्याची माहिती कळतेय. या बैठकीत महाविकास आघाडीचे महत्वाचे नेते आपली उपस्थिती लावणार आहेत. मात्र वंचित बहुजन आघाडी नेते प्रकाश आंबेडकर या बैठकीला हजर राहणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. काही दिवसांपुर्वी प्रकाश आंबेडकरांनी आम्ही महाविकास आघाडीमध्ये सामील झालोय असं वक्तव्य केलं होतं
मात्र कालच्या त्यांच्या वक्तव्यावतुन ते असे म्हणाले की अद्यापही आमचा महाविकास आघाडीमध्ये समावेश झालेला नाही. आमचा लढा हा भाजपच्या विरोधात असून या देशात जी झुंडशाही चालवली जात आहे त्याला संपवून इथे लोकशाही नांदली पाहिजे, असंही आंबेडकर यावेळी म्हणाले त्यामूळे प्रकाश आंबेडकर आता नेमकी काय भूमिका घेतील हे पाहणे महत्वाचे आहे.
दरम्यान त्यांना महाविकास आघाडीमध्ये सामील करून घेण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांचं एकमत झाल्याची माहिती