ठाकरे सरकार पडणार का? ज्या दिवशी पडेल, अल्टरनेट देऊ: देवेंद्र फडणवीस

Update: 2021-06-22 09:22 GMT

सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये तीनही पक्षांमध्ये संवाद नसल्याचं बोललं जात आहे. अशा परिस्थितीमध्ये हे सरकार पडणार का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांना केला असता, त्यांनी हे सरकार पडले तर आपण अल्टरनेट देऊ अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे. ते आज विधान भवनाच्या बाहेर माध्यमांशी बोलत होते. राज्याच्या पावसाळी अधिवेशनासंदर्भात आज बैठक झाली. या बैठकीत राज्याचं पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचं घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.

काय म्हटलंय फडणवीस यांनी?

हे सरकार आपल्याच ओझ्याने हे सरकार पडणार आहे. ज्या दिवशी हे सरकार पडेल, त्या दिवशी आम्ही पर्याय देऊ, जोपर्यंत विरोधी पक्षात आहोत, तोपर्यंत विरोधी पक्ष म्हणून आमची जबाबदारी सक्षमपणे पार पाडू. देशाच्या 70-72 वर्षाच्या इतिहासात असली सरकारं चालताना दिसली नाही. पण आम्ही सरकार पाडणार नाही.

असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

Full View

Tags:    

Similar News