मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या अध्यक्षपदी बहुमताने शरद पवार विजयी

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बहुमताने निवड झाली आहे.

Update: 2021-10-24 09:06 GMT

'मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या' विविध शाखांमध्ये पार पडलेल्या निवडणुकीचा निकाल ८ ऑक्टोबरला लागला होता. यातून ३४ जण सर्वसाधारण सभेवर निवडून आले. यातील १५ जणांच्या कार्यकारिणीची औपचारिकता पूर्ण झाली आहे. गेली ४० वर्षे शरद पवार हे ग्रंथसंग्रहालयाच्या अध्यक्षपदी आहेत. या वेळी त्यांनी पुन्हा अध्यक्ष पदासाठी अर्ज सादर के ला असून 'आप'चे धनंजय शिंदे त्यांच्या विरोधात उभे होते. शरद पवारांनी ३४ पैकी २९ मते घेऊन विजय मिळवला आहे. तर त्यांच्या विरोधात `आप`चे धनंजय शिंदेंना केवळ २ मतं मिळाली आहेत.उपाध्यक्ष पदाच्या सात जागांसाठी चौदा उमेदवार होते. निवडणूक एकतर्फीच होवून सात दिग्गज उमेदवार निवडून आले.

निवडून आलेल्यात,

1) सौ विद्या चव्हाण, माजी आमदार

2) श्री. भालचंद्र मुणगेकर, माजी खासदार व मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू

3) माजी हायकोर्ट न्यायाधीश श्री. अरविंद सावंत

हे सर्वज्ञात चेहरे आहेत

तसेच

श्री़. प्रदीप कर्णिक

श्री.प्रभाकर नारकर

कु.अमला नेवाळकर

श्री. शशी प्रभू, हेही निवडून आले.

15 कार्यकारिणी सदस्यांची निवड बिनविरोध झाली. लवकरच कार्यकारिणी सदस्यांमधून विविध पदाधिकारी नेमण्यात येतील, असे निवडणुक अधिकारी किरण सोनवणे यांनी सांगितले.

कार्यकारिणी सदस्य

श्री.जयवंत गोलतकर

श्री.सुरेंद्र करंबे

श्री.उदय सावंत

श्री.रवींद्र गावडे

श्री.सुनील राणे

श्री.विनायक परब

श्री. प्रदीप ओगले

श्री. हेमंत जोशी

श्री मनीष मेस्त्री

सौ.शीतल करदेकर

श्री.मारुती नांदविस्कर

सौ. उमा नाबर

श्री.सूर्यकांत गायकवाड

सौ.शिल्पा पितळे

स्वप्निल लाखवडे

संस्थेचे आजीव सभासद अनिल गलगली यांनी या निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे. सर्वसाधारण सभेची निवडणूक घटनाबाह्य असल्याचा आरोप करत गलगली आणि अन्य काही सभासदांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने धर्मादाय आयुक्तांना याबाबत सुनावणीचे आदेश दिले. धर्मादाय आयुक्तांनी सुनावणी घेत निवडणुकीला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे रविवारी ही निवडणूक घेतली जात आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांच्या निवडणुकीत सर्वसाधारण सभेतील सदस्य मतदान करतात. निवडणुकीला उभे राहिलेले उमेदवार हे सर्वसाधारण सभेचा भाग नसल्याने त्यांना मतदानाचा अधिकार नाही, असे निवडणूक अधिकारी किरण सोनावणे यांनी स्पष्ट केले होते.

Tags:    

Similar News