किरीट सोमय्या यांना कोर्टाचा दणका, विक्रांत प्रकरणी अटक होणार?

Update: 2022-04-11 12:27 GMT

विक्रांत जहाज वाचवण्यासाठी गोळा केलेल्या पैशांच्या अपहाराच्या आरोप प्रकरणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. किरीट सोमय्या यांनी विक्रांत जहाज वाचवण्यासाठी २०१३मध्ये जनतेमधून पैसा गोळा केला होता. ही रक्कम तब्बल ५७ कोटी रुपये एवढी होती आणि त्या रकमेचा सोमय्या यांनी अपहार केला, असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. यानंतर सोमय्या यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने किरीट सोमय्या यांनी अटक टाळण्यासाठी कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावरील सुनावणी मुंबई सत्र न्यायालयात झाली. या सुनावणीमध्ये कोर्टाने सोमय्या यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे.

दोन्ही बाजूचा युक्तीवाद झाल्यानंतर कोर्टाने निर्णय राखून ठेवला होता, त्यानंतर कोर्टाने दुपारी निर्णय दिला आहे. कोर्टात किरीट सोमय्या यांच्यातर्फे युक्तीवाद करणाऱ्या वकील पवनी चड्डा यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमय्या यांनी ते पैसे राजभवनात दिले याचा कोणताही ठोस पुरावा सादर केलेला नाही, त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन देता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. पण कोर्टातील सुनावणी दरम्यान किरीट सोमय्या यांनी हे पैसे आपण भारतीय जनता पक्षाला दिले होते, अशी कबुली दिल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली होती. ही रक्कम ५७ कोटी नसून ११ हजार २६४ रुपये होती, अशीही माहिती त्यांनी दिली आहे. पण यावेळी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी अपहार किती रुपयांचा आहे यापेक्षा अपहार झाला आहे, त्यामुळे चौकशीसाठी सोमय्या पितापुत्रांना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. तसेच त्यांनी जर भाजला पैसे दिले असतील तर यामध्ये ते पैसे कुणाला दिले, त्या पैशांचे काय झाले, त्याचा वापर कशासाठी केला गेला, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान किरीट सोमय्या यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे जर इतरही पक्षांनी विक्रांतच्या नावाने पैसे गोळा केले असतील तर त्यांचीही चौकशी होणार असे घरत यांनी म्हटले आहे.

संजय राऊत यांचा टोला यानंतर शिवसेनेते खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन किरीट सोमय्या यांना टोला लगावला आहे.

बाप बेटे जेल जायेंगे.. अनिल देशमुख नवाब मलिक के बाजुकेही कोठडी मे रहेंगे.. असे ट्विट करत त्यामध्ये एक शेरही त्यांनी शेअर केला आहे.

Tags:    

Similar News