राहुल गांधींवर टीका करताना केंद्रीय मंत्र्यांची भाषा घसरली

Update: 2021-06-28 03:57 GMT

डेल्टा प्लसमुळे सध्या कोरोनाचे संकट पुन्हा गंभीर झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लसीकरणाच्या मुद्द्यावर राजकारण न करण्याचे आवाहन करत आहेत. पण मोदींच्याच मंत्री मंडळातील मंत्र्यांनीच त्यांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते आहे. याला कारण ठरले आहेत केंद्रीय मंत्री मुक्तार अब्बास नक्वी... काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका करताना नक्वी यांची भाषा खूपच घसरली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमावर राहुल गांधी यांनी टीका केली होती. देशालद्यात कोरोनावरील लसींचा तुटवडा आहे, लस उपलब्ध करुन द्या, जनतेचे लक्ष इतरत्र वळवू नका, अशी टीकारविवारी ट्विटरवर केली होती. यानंतर भाजपचे मंत्री मुक्तार अब्बास नक्वी यांनी राहुल गांधी यांच्या ट्विटला ट्विटने उत्तर दिले. पण ही टीका करताना त्यांनी पातळी सोडून टीका केली आहे.

"पप्पू"कब वैक्सीन लगवाए गा? या "भटकाना,भ्रमाना,भय,भ्रम का भौकाल" ही है पप्पू की प्रतिरोधक क्षमता?

नक्वी यांच्या या भाषेला अनेक नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. एका मंत्र्यांला ही भाषा शोभत नाही, अशा भाषेचा वापर त्या व्यक्तीची क्षमता काय आहे हेच सिद्ध करते, असेही काही नेटकऱ्यांनी सुनावले आहे.

Tags:    

Similar News