पावसाळी अधिवेशनात शिविगाळीचा चिखल....

आई-बहिनिवरून शिविगाळ, भाजप आणि ठाकरेंची शिवसेना एकमेकांना सभागृहातच भिडली.

Update: 2024-07-01 13:46 GMT

मुंबई (विधान परिषद) - पावसाळी अधिवेशनाच रूप आज पेटलेलं पाहायला मिळालं. विधान परिषद सभागृहात चर्चेच रूपांतर बाचाबाचीत आणि नंतर थेट शिविगाळीत झालं. विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यात शिविगाळी झाली.

भारतीय संसदेमध्ये राहुल गांधी यांनी हिंदू हिंसक असतात असं वक्तव्य केलं आणि यामुळे हिंदूंचा अपमान झाला आहे. असा आरोप करत आमदार प्रसाद लाड यांनी सभागृहामध्ये राहुल गांधी यांच्या वक्तव्याच्या विरोधामध्ये निषेधाचा प्रस्ताव ठेवला. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपली भूमिका मांडावी हा आग्रह करत लाड यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. यावेळी सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्ष यांच्यात गोंधळ होऊ लागल्याने विधान परिषद सभापती यांच्याकडून पाच मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. यानंतर सभागृह पुन्हा सुरू झाल्यावर प्रसाद लाड यांच्या आक्रमक भूमिके नंतर अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यात सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली. याचे रूपांतर पुढे बाचाबाचीत झाले आणि आमदार प्रसाद लाड यांनी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्याकडे बोटवारे करत आक्रमक भूमिका घेतली.

"माझ्याकडे बोटवारे करू नकोस" असे वक्तव्य विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केले. यावेळी ते दानवे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. या आक्रमकतेतच असंविधानिक वक्तव्य करत सभागृहांमध्येच अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली. अंबादास दानवे यांच्या शिविगाळीला प्रतिउत्तर देत असताना. प्रसाद लाड यांच्याकडूनही एकदा विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना शिवी देण्यात आली. यानंतर दानवे पुन्हा आक्रमक झाले सभागृहामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याने. यानंतर विधान परिषद सभापती नीलम गोऱ्हे यांनी सभागृह दुसऱ्या दिवसापर्यंत स्थगित केले.

विधान परिषद सभागृहामध्ये आज सकाळपासूनच विरोधक व सत्ताधारी यांच्यामध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. सुरुवातीला भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकल्याबद्दल आमदार आशिष शेलार यांच्या अभिनंदनाचा प्रस्तावावर विरोधकांनी गोंधळ घालत सभा त्याग केला. यानंतर राहुल गांधी यांच्या वक्तव्याने पुन्हा विधान परिषदेत च्या कामकाजामध्ये गोंधळ निर्माण झाला हा गोंधळ शिविगाळी पर्यंत गेला. या मुळे सभागृहच स्थगित करण्याची वेळ विधान परिषद सभापतींवर आली.

Tags:    

Similar News