भाजपने 'त्या' भांडग्यांची तोंड वेळीच बंद करा , अन्यथा राज्यात भाजप देखील संपून जाईल – राऊत

महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन, चंद्रकांत पाटील यांची भाजपा आता राहिलेली नाही. तर प्रसाद लाड, नितेश राणे सारख्या भांडग्यांची भाजपा झालेली आहे, अशी बोचरी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली.;

facebooktwitter-greylinkedin
Update: 2021-08-01 08:37 GMT
भाजपने  त्या भांडग्यांची तोंड वेळीच बंद करा , अन्यथा राज्यात भाजप देखील संपून जाईल – राऊत
  • whatsapp icon

महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन, चंद्रकांत पाटील यांची भाजपा आता राहिलेली नाही. तर प्रसाद लाड, नितेश राणे सारख्या भांडग्यांची भाजपा झालेली आहे, अशी बोचरी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली. प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी ही टीका केली आहे.

प्रसाद लाड, नितेश राणे सारखे भांडगे लोक आता खूप भुंकायला लागले आहेत. अशा लोकांची तोंड बंद करायला शिवसेनेला फारसा वेळ लागणार नाही. भाजपने अशा भांडग्यांची तोंड वेळीच बंद केली नाही तर भाजप देखील संपून जाईल असं राऊत यांनी म्हटलं आहे. अशा भांडग्यांना गाडण्याची ताकद शिवसेनेत आहे हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहीजे असंही राऊत म्हणाले.

नारायण राणे यांच्यावर अवैध संपत्ती जमा केल्याप्रकरणी ED ने जी कारवाई केली त्यामुळे त्यांनी भाजपाचे पाय पकडले. त्यामुळे भांडग्यांनी आधी त्यांच्या घरामध्ये काय आहे ते शोधावं मग शिवसेनेवर टीका करावी असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

तुमची ओळख ही केवळ शिवसेनेमुळेच झाली आहे. हे विसरू नका असं राऊत म्हणाले.

शिवसेना भवनाला भाजपाचा बालेकिल्ला बनवण्याचे तुमचे स्वप्न या जन्मात तर शक्यच नाही, भविष्यात कणकवलीमध्ये सुद्धा तुमचे विसर्जन करण्याचा निर्धार आमच्या शिवसैनिकांनी केला आहे असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

Tags:    

Similar News