गुन्हेगारांना पाठीशी घालाणाऱ्यांची चौकशी करा - खा.उदयनराजे भोसले

Update: 2021-10-16 16:29 GMT

सातारा शहरात दहशत माजवणाऱ्या मोक्यातील गुंडांना पाठीशी घालून राजकारणात संधी देऊन त्यांना नगरसेवक केले जाते आणि त्यांच्या माध्यमातून शहरात दहशत पसरवण्याचे काम काही लोकप्रतिनिधी करत आहेत, त्यामुळे गुंडांना पाठीशी घालणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी खा.उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे.

खा. उदयनराजे भोसले यांनी आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कार्यकर्ते आणि सध्या एका मोठ्या गुन्ह्यात फरार असलेल्या बाळू खंदारे यांचे नाव न घेता त्याच्यावरील गुन्हेगारीचा पाढा वाचून त्या गुंडाला तात्काळ अटक करा तो मोक्यातूनही बाहेर आला याची ही माहिती खा.उदयनराजेंनी दिली.

दरम्यान यावेळी त्यांनी मतदारांवरही नाराजी व्यक्त केली, जो तळमळीने समाजासाठी काम करतो त्यांना मतदार घरी बसवतात आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांना निवडून देतात त्यामुळे गुन्हेगारी वाढत आहे असं खा. उदयनराजे भोसले म्हणाले. सोबतच राजकीय पक्षांनी देखील उमेदवार निवडताना निकष ठेवावेत, सध्या जो मोठा गुन्हेगार तोच उमेदवार अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळत आहे, त्यामुळे याचे परिणाम सर्व सामान्य नागरिकांना येत्या काळात भोगावे लागतील त्यामुळे नागरिकांनी देखील लोकप्रतिनिधी निवडताना विचारपूर्वक निवडला पाहिजे असं त्यांनी म्हटले.

Tags:    

Similar News