पुणे : माजी खासदार नीलेश राणे ह्याच्या पुण्यातील मालमत्तेवर पुणे महानगर पालिकेने कारवाई केली आहे. पुणे महानगर पालिकेच्या मालमत्ता कर थकवल्या मुळे महापालिकेने राणे ह्याची वेवसायीक मालमत्तेवर संबधीत कारवाई केली आहे.
पुणे महानगर पालिकेचा तीन कोटी ७७ लाख ५३ हजार रुपयांचा मालमत्ता कर थकावल्या प्रकरणी नीलेश राणे ह्यांच्या पुण्यातील मालमत्तेवर कारवाई करण्यात आली आहे. डेक्कन परिसरामध्ये असणारा आर डेक्कन नावाचा मॉल हा निलेश राणे ह्यांच्या नावावर आहे. ह्या मिळकतीचा कर थकावल्या प्रकरणी पुणे महानगर पालिके कडून राणे ह्यांची मिळकत सिल कऱण्यात आली आहे. आर डेक्कन मॉल मधील तिसऱ्या मजल्यावर राणे ह्याची वेवसायीक मिळकत होती.
साधारण पाच कोटी ६०लाख रुपयांची थकबाकी राणे ह्याच्यावर होती. त्यातील एक कोटी ४०लाख रुपयांची थकबाकी भरण्यात आली होती. मात्र उर्वरित थकबाकी आसल्याने राणे ह्याच्या मिळकतीवर महापालिकेकडून करवाई करण्यात आली आहे.थकबाकी प्रकरणी वारंवार नोटिस देऊन देखील थकाबाकी नभरल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
मार्च एंडिंग आसल्याने महापालिकेकडून मिळकत कर वसुली मोठया प्रमाणात करण्यात येत आहे. कर थकबाकी दारांवर महापालिका प्रशासनाकडून कारवाई देखील करण्यात येत आहे. ह्या विषयी काल शहरातील वेवसायीक थकबाकी धारकर असणाऱ्या साधारण १६ जणांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. ह्यातील एक कारवाई माझी खासदार नीलेश राणे ह्याच्या मालमत्तेवर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.