#गावगाड्याचे_इलेक्शन : सासू विरुद्ध सून आणि सासरा विरुद्ध जावई लढत
प्रेमात आणि राजकारणात सर्व काही चालतं असं म्हणतात, याचाच प्रत्यय सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत येतो आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील धोंधलगावात चक्क सासू विरोधात सुनेने तर जावयाविरोधात सासऱ्याने निवडणुकीत उडी घेतली आहे. त्यामुळे नेमका कसा आहे या ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार पाहू य आमचे सीनिअर करस्पाँडन्ट मोसीन शेख यांचा ग्राऊंड रिपोर्ट....;
गावातील गल्या-गल्यांमध्ये हातात प्रचाराचे पॉम्प्लेट घेऊन फिरणारे कार्यकर्ते आणि उमेदवार...हे चित्र सध्या, औरंगाबादच्या धोंधलगावात दिसते आहे. या गावाच्या निवडणुकीची चर्चा अख्या जिल्ह्यात सुरू आहे. त्याचे कारण म्हणजे, भेटीगाठी घेऊन मतदान करण्याचे आवाहन करणाऱ्या सासू विरुद्ध सुन आणि सासरा विरुद्ध जावई या लढतीने गावच्या निवडणुकीत रंगत आणली आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची चर्चा पंचक्रोशीत सुरू आहे. गावात शिवशाही विरोधात छत्रपती ग्रामविकास पॅनलमध्ये थेट लढत होणार आहे...शिवशाही पॅनलकडून सासू गोकर्णा आवारे आणि जावई लक्ष्मण काळे निवडणुकीच्या रिंगणात आहे. तर छत्रपती ग्रामविकास पॅनलकडून सून कल्याणी आवारे आणि सासरे रावसाहेब वैद्य रिंगणात उतरले आहेत. सासूच्या विरोधात सूनेनं आणि सासऱ्याच्या विरोधात जावयानं निवडून येण्याचा दावा केला आहे...
या सगळ्या निवडणुकीच्या गोंधळात मात्र खरी गोची झाली आहे ती यांच्या कुटुंबातील मुलाची आणि मुलीची...कारण प्रचार आईचा करायचा की बायकोचा आणि दुसरीकडे प्रचार नवऱ्याचा करायचा की वडिलांचा असा प्रश्न पडला आहे...निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी दोन्ही घरातले दोन उमेदवार सत्तेत येणार एवढे मात्र निश्चित आहे...