गेल्या 7 महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या विविध राज्यांच्या सिमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. हे तीनही कायदे परत घेतले जावे. यासाठी शेतकरी हे आंदोलन करत आहेत. संसदेने पारित केलेल्या 3 कृषी कायद्यांबाबत शेतकरी हे दिल्लीत आंदोलन करीत आहेत. हे कायदे कॉर्पोरेटच्या फायद्यासाठी असल्याचे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे. या कायद्यांची अंमलबजावणी झाल्यानंतर कॉर्पोरेट्स कंपन्यांना केवळ शेतीमाल सहजपणे खरेदी करू शकणार नाहीत तर आवश्यकतेनुसार करारनामा करू शकतील व उत्पादन खरेदी करुन ते स्वत: कडे साठवण करु शकतील. असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. म्हणून शेतकरी आंदोलन करत आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी सध्या सोशल मीडियावर एक ट्रेंन्ड सुरु केला आहे.
#मोदीहीडकैतहै असा हा ट्रेंड असून यामध्ये लोक मोदींवर टीका करत आहेत. सोशल मीडियावर अनेक लोकांनी मीम्स तयार करुन मोदींवर निशाणा साधला आहे. सध्या या ट्रेंडमध्ये 80 हजार पेक्षा अधिक लोकांनी ट्वीट केले आहेत. #मोदीहीडकैतहै च्या बरोबरच #FarmerProtest देखील ट्रेंड करत आहे.
अनेक प्रकारचे ट्वीटर ट्वीट या युजर ने पोस्ट केले आहेत. पाहा हे ट्वीट... काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत. तीनही कृषी कायदे रद्द करण्यात यावेत. सर्व शेतकऱ्यांना स्वाभिनाथन आयोगाच्या शिफारसी प्रमाणे हमी भाव परावली: वायू गुणवत्ता संशोधन अध्यादेशातून शेतकऱ्याला वगळावे (पाचट जाळल्या प्रकरणी दंडाची तरतूद असलेले) या संदर्भात सरकार सकारात्मक आहे विद्युत संशोधन विधेयक 2020 यामध्ये बदल करण्यात यावा (याबाबत सरकार सकारात्मक आहे)