पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा खेळलं ओबीसी कार्ड
2014 च्या निवडणूकीत पंतप्रधान मोदी यांनी ओबीसी कार्डचा वापर केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा छत्तीसगड विधानसभा निवडणूकीत ओबीसी कार्ड वर काढले आहे.;
2014 च्या लोकसभा निवडणूकीत पंतप्रधान मोदी यांनी आदिवासी कार्ड काढले होते. त्यावेळी मी मागास प्रवर्गातील असल्यानेच काँग्रेस मला विरोध करत असल्याची टीका पंतप्रधान मोदी यांनी केली होती. त्यानंतर आता पुन्हा पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकीचा प्रचार शिगेला पोहचला असतानाच पंतप्रधान मोदी यांनी ओबीसी कार्ड वर काढले आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, काँग्रेसला कायम दलित, आदिवासींचा राग येतो. त्यातच एक ओबीसी व्यक्ती पंतप्रधान पदावर बसल्याने त्यांना माझा राग आहे. हे पद कायम त्यांच्या कुटूंबियांसाठी आरक्षित होतं. मात्र मी त्या पदावर बसल्याने माझा काँग्रेसला राग येत आहे. त्यातच ओबीसी समाजाचा अपमान केल्याने कोर्टाने त्यांना दोषी ठरवलं आहे. मात्र त्यांच्याकडून आदिवासी, दलित, ओबीसींचा अपमान केला जात असल्याची टीका पंतप्रधान मोदी यांनी केली. त्यामुळे पुन्हा एकदा छत्तीसगडमध्ये पंतप्रधान मोदी यांनी काढलेल्या ओबीसी कार्डची जोरदार चर्चा रंगली आहे.