गेल्या काही दिवसांपासून मोदी मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा होती. अखेर हा मंत्रीमंडश सोहळा Modi Cabinet expansion नुकताच पार पडला. या मंत्रीमंडळ विस्तारात ४३ नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. दरम्यान या ४३ मंत्र्यांच्यासह मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या आता ७८ झाली आहे. मात्र, या ७८ मंत्र्यांच्या मंत्र्यांच्या शिक्षणाकडे नजर टाकली तर आपल्याला या यातील अनेक मंत्र्यांचं शिक्षण ८ वी ते १२ दरम्यान असल्याचं समोर आलं आहे.
मोदी मंत्रिमंडळाच्या ७८ मंत्र्यांपैकी १५ टक्के म्हणजेच १२ मंत्र्यांची शैक्षणिक पात्रता ८ वी ते १२ वी दरम्यानची आहे. तर ६४ मंत्री म्हणजेच सुमारे ८२ टक्के मंत्री पदवीधर आणि त्याहून अधिक पात्रतेचे आहेत. यापैकी दोन मंत्री पदविकाधारक आणि 17 पदवीधर आहेत. या व्यतिरिक्त उर्वरित १७ व्यावसायिक पदवीधर असून २१ मंत्री पदव्युत्तर पदवीधर आणि 9 डॉक्टर आहेत.