इतर मागासवर्गीयांसाठी राज्यात मोदी आवास घरकुल योजना घोषित.
राज्यातील इतर मागासवर्गीयांसाठी 3 वर्षांत 10 लाख घरांची ‘मोदी आवास घरकुल योजना’(modi awas yojana)घोषित करण्यात आली आहे.
राज्यातील इतर मागासवर्गीयांसाठी 3 वर्षांत 10 लाख घरांची ‘मोदी आवास घरकुल योजना’(modi awas yojana)घोषित करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत इतर मागासवर्गियांसाठी 3 वर्षांत 10 लाख घरांचे उद्दीष्ट असून 12,000 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.
सर्वांसाठी घरे या योजनेअंतर्गत यावर्षी 10 लाख घरांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 4 लाख घरांची घोषणा करण्यात आली असून यातील 2.5 लाख घरे अनुसूचित जाती-जमाती साठी बांधण्यात येणार आहेत. तर 1.5 लाख घरे इतर प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.
रमाई आवास (Ramai Awas Yojana) योजनेअंतर्गत 1.5 लाख घरांच्या उद्दिष्ठासाठी सुमारे 1800 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे.
यातील 25 हजार घरे मातंग समाजासाठी राखीव ठेवण्यात आलेली आहेत.
शबरी, पारधी, आदिम आवास योजनेअंतर्गत 1 लाख घरांसाठी 1200 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
-यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत 50,000 घरांचे उद्दिष्ठ ठरवले असून त्यासाठी 600 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे.
यातील 25,000 घरे विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी तसेच धनगर समाजासाठी 25,000 घरे राखीव ठेवण्यात आलेली आहेत.