अंटालिया स्फोटकं प्रकरणाला वेगळी दिशा देऊ नका : राज ठाकरे

फक्त पैसे काढण्यासाठी बॉम्ब ठेवलेला नाही, यामागचं कारण वेगळंच आहे. आपण पूर्वी ऐकायचो की अतिरेकी बॉम्ब ठेवतात पण आता पोलीसच बॉम्ब ठेवायला लागले तर करायचं काय? पोलिस नक्कीच कुणाच्या इशाऱ्यावर काम करत असतील तर एक गंभीर आहे. मुळ प्रश्न उद्योजक मुकेश अंबानीच्या घराबाहेर स्फोटकं कुणी आणि कशासाठी ठेवली हा असून या प्रकरणाची महाराष्ट्रात आता चौकशी होऊ शकत नाही केंद्र सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज पत्रकार परीषदेत केली.;

Update: 2021-03-21 07:23 GMT

पत्रकार परीषदेच्या सुरवातीलाच राज ठाकरेंनी मी फक्त निवेदन करणार असून प्रश्नोत्तर होणार नाही असं सांगितलं होतं. अंबानी स्फोटकं प्रकरणाची चौकशी केंद्रांनी करावी, चौकशी केली तर फटाक्याची माळ लागेल असंही राज ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि मुकेश अंबानी हे चांगले मित्र आहे. अत्यंत मधुर संबंध आहेत, शपथविधीलाही ते उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुकेश अंबानी चे मित्र आहेत ते त्यांना धमकावणार नाहीत. धमकाऊन अंबानीकडून पैसे वसुल करणं एवढं सोपं आहे का? असं राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्राचा गृहमंत्री सांगतोय बारमध्ये जाऊन पैसे गोळा अशी परिस्थिती कधीही निर्माण झाली नव्हती.बारमध्ये जाऊन पैसे गोळा करा, असं गृहमंत्री सांगतो, हे ऐकून लाज वाटली.केंद्राने याचा गांभीर्याने तपास केला नाही, तर हा देश अराजकतेकडे चालला आहे, असं म्हणावं लागेल.

एका उद्योगपतीच्या घरासमोर पोलिसांकडून बॉम्ब ठेवला जातो ही क्षुल्लक गोष्ट नाही.हे प्रकरण नक्कीच वेगळं असणार आहे. महाराष्ट्र पुढे अनेक प्रश्न असताना अशा प्रकरणावर चर्चा करून विषय डायव्हर्ट करू नका असंही राज ठाकरे म्हणाले. गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा दिलाच पाहिजे अशी मागणी केली. पोलीस बॉम्ब ठेवतायत ही घटना शुल्लक नाही. केंद्र सरकारने या प्रकरणाची कसून चौकशी केली पाहिजे, असही देशमुख म्हणाले.

मुकेश अंबानी यांना इस्राईलची कडेकोट सुरक्षा व्यवस्था असून मध्य प्रदेशचे पोलीस त्यांची सुरक्षा करतात अशी माझी माहिती आहे असं राज ठाकरेंनी सांगितलं.

राज ठाकरे म्हणाले, या प्रकरणात इतक्या गाड्यांचा सहभाग की आता वाझेची गाडी कोणती तेच कळेनासं झालं आहे.

Full View


वाझे ख्वाजा युनूस प्रकरणात 17 वर्षे निलंबित होता. 58 दिवस तुरुंगात होता. दरम्यान त्याने शिवसेनेत प्रवेश केला होता. त्याला शिवसेनेत प्रवेश मिळवून देण्यासाठी कोण घेऊन गेलं होतं?देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात वाझेला पुन्हा पोलीस सेवेत घ्यावं, अशी मागणी शिवसेनेने केली होती.आता तर फक्त मुंबईचे पोलीस आयुक्त बोलले आहेत इतर शहराच्या पोलिस आयुक्तांकडून किती वसुली केली जाते याचीही माहिती घ्यायला हवी. या प्रकरणाची महाराष्ट्रात आता चौकशी होऊ शकत नाही केंद्र सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे. मुंबई पोलिस आयुक्तांची बदली का केली ? जर दोषी असतील तर चौकशी का केली नाही.स्फोटक भरलेली गाडी पोलिसांमार्फत एका उद्योगपतीच्या घरासमोर ठेवली जाते ही सोपी गोष्ट नाही. सरकार बरखास्त करा राष्ट्रपती राजवट लागू करा या सगळ्या राजकीय मागण्या आहेत. सरकार बरखास्त करून प्रश्न सुटणार नाही, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

खोलात जाऊन हे कृत्य कोणी केले याचा छडा लावला पाहिजे. राज्य आणि देश अराजकतेकडे जातोय. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकं ठेवलेल्या गाडीचा केंद्रीय यंत्रणेकडून कसून चौकशी केल्यास, कल्पनेबाहेरील चेहरे समोर येतील, असा दावा राज ठाकरे यांनी केला आहे."परमबीर सिंह यांचाही या प्रकरणात सहभाग आहे, हे लक्षात आलं होतं तर चौकशी का नाही केली, बदली का करण्यात आली?" असा सवाल करत राज ठाकरे यांनी केला.

धमकीचं पत्रातला मजकूर पाहिला. धमकी देणारा माणूस 'नीता भाभी'. 'मुकेश भैय्या' असं आदराने कसं बोलू शकतो?अंबानींकडून कुणी पैसे काढू शकतो का? ज्या मुख्यमंत्र्यांचे अंबानींशी इतके मधुर संबंध आहेत, तिथं पोलीस पैसे काढायला जातील का? कुणाच्या सांगण्यावरून ही गाडी ठेवण्यात आली, याची कसून चौकशी होणं आवश्यक आहे. या विषयात केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी त्यांनी केली.

Tags:    

Similar News