मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याच्या चर्चेवरून मनसेचा शिवसेनेला टोला

मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव या शिवसेनेच्या टीकेला मनसेने प्रत्युत्तर दिले आहे.;

Update: 2022-04-11 06:09 GMT

राज्यात भाजप शिवसेना (Shivsena Vs BJP) संघर्ष सुरू आहे. त्यातच आता मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा डाव असल्याची टीका शिवसेनेकडून सुरू आहे. त्याचा मनसेचे नेते संदीप देशपांडे (sandip Deshpande) यांनी चांगलाच समाचार घेतला.

मुंबई (Mumbai) ही महाराष्ट्राची राजधानीच नाही तर देशाची आर्थिक राजधानी आहे. मात्र ही मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा डाव असल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी केली होती. त्यातच मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या माध्यमातून मुंबईला बकाल करण्याचा डाव असल्याचेही संजय राऊत म्हटले होते. मात्र त्यावर मनसेने प्रतिक्रीया दिली आहे. (MNS Criticize to Sanjay raut)

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, विचार भ्रमकार सामनावीर यांनी जो हिशोब 'ED' ला द्यायचा आहे. त्याची चिंता करावी. राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना असताना मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची हिंमत कोणाच्या बापात नाही, असे ट्वीट केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मनसे शिवसेना आमनेसामने आले आहेत. (Sandeep Deshpande tweet)

येत्या काळात मुंबई महापालिकेची निवडणूक (BMC Election) डोळ्यासमोर ठेऊन मुंबईचे राजकारण तापायला सुरूवात झाली आहे. त्यातच मुंबईत मनसेने मशिदींवरील भोंगे काढले नाही तर त्यासमोर हनुमान चालिसा वाजवणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे मुंबईत मनसेकडून धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा तापवला जात असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे मराठी मतांसाठी मुंबई महाराष्ट्रातून तोडण्याचा डाव असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात येत आहे. त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावर लढणाऱ्या मनसेने मुबई महाराष्ट्रापासून तोडण्याची कोणाच्या बापात हिंमत नसल्याची टीका शिवसेनेवर केली आहे.

Tags:    

Similar News