प्रवीण तुझी लायकी किती? राज ठाकरे यांच्यावरील टीकेनंतर मनसे नेत्याचा प्रवीण दरेकर यांना सवाल
प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर मनसे (MNS) नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यातच मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांच्याशी बोलताना मनसे नेते कर्णा दुणबळे यांनी प्रवीण दरेकर यांची लायकीच काढली आहे.;
राज ठाकरे हे शरद पवार (Sharad pawar) यांच्यासारखेच असल्याची टीका प्रवीण दरेकर (Pravin Darekar यांनी केली होती. त्याबरोबरच राज ठाकरे यांच्या पक्षाची अवस्था याबाबतही प्रवीण दरेकर यांनी वक्तव्य केले होते. यावेळी प्रवीण दरेकर यांनी राज ठाकरे (Raj Thackeray)यांचा एकेरी उल्लेख केला होता. यावरून मनसे नेते कर्णा दुणबळे यांनी प्रवीण दरेकर यांच्यावर टीका केली.
यावेळी कर्णा दुणबळे म्हणाले की, प्रवीण दरेकर यांची लायकी ही राज ठाकरे यांच्या दारातील कुत्र्याचे पाय चाटणाऱ्या इतकी आहे. त्यांनी एक लक्षात ठेवावं की, तुमची लायकी किती? प्रवीण तुझा पगार किती? तु बोलतो किती? असे अनेक सवाल कर्णा दुणबळे यांनी प्रवीण दरेकर यांना केले आहेत.
याबरोबरच माझ्याकडे जेव्हा बीएमडब्लू (BMW) कार होती. तेव्हा तू सेकंड हँड सफारी (Safari) कार घेतली होती. त्यामुळे तु लायकीत रहा, असं म्हणत कर्णा दुणबळे यांनी प्रवीण दरेकर यांच्यावर टीका केली.