मनसे शिवसेना-भाजप विरोधात आक्रमक, टोल नाके फोडूनच बंद झाले, राजू पाटील यांचं वक्तव्य

मनसेने आपल्या स्थापनेपासूनच खळखट्याकची भूमिका घेतली आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून मनसे पुन्हा रस्त्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक झाली आहे. त्यातच राजू पाटील यांनी शिवसेना आणि भाजपवर जोरदार निशाणा साधलाय.;

Update: 2023-08-25 02:59 GMT

राज ठाकरे यांच्या पनवेल सभेनंतर मनसे आणखी आक्रमक झाली आहे. त्यातच मुंबई-गोवा महामार्गावरील टोलनाके फोडण्यासह रस्त्यांवर कमळ लावून आंदोलनही केले आहे. त्यातच आता मनसे आमदार राजू पाटील यांनी शिवसेना भाजपवर टीका केली आहे.

राजू पाटील म्हणाले, आमचा पक्ष हा तरुणांचा पक्ष आहे. त्यामुळे जे टोलनाके बंद झाले आहेत ते फोडूनच बंद झाले आहेत. रस्ते नसताना टोल आकारला जातो. त्यामुळे ते फोडले जाणारच. त्यामुळे आमच्यावर केलेल्या आरोपांना आम्ही भीक घालत नाही, असं म्हणत आमदार राजू पाटील यांनी थेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला. त्यातच ठाण्चे पालकमंत्री हे साताऱ्याला राहतात. त्यामुळे त्यांना येण्यासाठी अडचण निर्माण होते. त्यामुळे पालकमंत्री बदलण्यात यावा, असं मत राजू पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी राजू पाटील यांनी शिवसेनेवरही टीका केली.

Tags:    

Similar News