"सोमय्यांची धमकी पोकळ, मीच अधिवेशनात पोलखोल करणार" - नवाब मलिक

Update: 2021-10-31 08:21 GMT

 भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शनिवारी मुंबईत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिवाळीनंतर फटाके फोडणार असल्याचे विधान केले होते. त्यांच्या या विधानाला प्रत्युत्तर म्हणून नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधताना सोमय्यांची धमकी पोकळ असल्याची टीका केली आहे.

सोमय्यांवर टीका करताना मलिक म्हणाले, "किरीट सोमय्या घोटाळे उघड करण्याची पोकळ धमकी देत आहेत. आम्हाला काय धमक्या देताय. आम्ही अशा धमक्यांना घाबरत नाही. आगामी अधिवेशनात मीच भाजपचे घोटाळे पुराव्यानिशी उघड करणार आहे.

याशिवाय रविवारी समीर वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर, वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन पत्रकार परीशद घेतली.त्यांच्या या पत्रकार परीषदेवर टीका करताना नवाब मलिक, "दलित व्यक्तीचा अधिकार हिरावणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी रामदास आठवले उभे राहत असतील तर हे दुर्दैव आहे," असं म्हणाले.

Tags:    

Similar News