उ.प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील लोकसंख्या नियंत्रणासाठी नवीन धोरण तयार केले आहे. या धोरणावरुन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे. राज्यातील वाढती लोकसंख्या आणि राज्याचा विकास करण्यासाठी हे लोकसंख्या धोरण आणत असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी या धोरणावरुन योगी आदित्यनाथ यांना टोला लगावला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "१३% मुस्लिमांना दोनपेक्षा जास्त मुलं असतील तर ८३% हिंदूंना दोनपेक्षा जास्त मुलं आहेत. लोकसंख्या नियंत्रण विधेयक म्हणजे अब्दुलची भीती दाखवून अतुलचं म्हातारपण कष्टप्रय करण्याचा डाव आहे."
१३% मुस्लिमांना दोनपेक्षा जास्त मुलं असतील तर ८३% हिंदूंना दोनपेक्षा जास्त मुलं आहेत.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 13, 2021
लोकसंख्या नियंत्रण विधेयक म्हणजे अब्दुलची भीती दाखवून अतुलचं म्हातारपण कष्टप्रय करण्याचा डाव आहे.
एवढेच नाही तर विधेयक मांडणाऱ्या भाजप नेत्यालाच ४ मुलं आहेत असा टोलाही त्यांनी लगावला आहे. "स्वतःला चार मुलं असलेले भाजपाचे गोरखपूरचे खासदार रवी किशन "लोकसंख्या नियंत्रण विधेयक" मांडणार. ज्येष्ठ विचारवंत एडवर्ड ल्यूस म्हणतो, "गरिबी माणसाला जास्त मुलं जन्माला घालायला भाग पाडते. ती त्याच्या उतारवयाची गुंतवणूक असते"
स्वतःला चार मुलं असलेले भाजपाचे गोरखपूरचे खासदार रवी किशन "लोकसंख्या नियंत्रण विधेयक" मांडणार.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 13, 2021
ज्येष्ठ विचारवंत एडवर्ड ल्यूस म्हणतो, "गरिबी माणसाला जास्त मुलं जन्माला घालायला भाग पाडते. ती त्याच्या उतारवयाची गुंतवणूक असते
योगी आदित्यनाथ यांच्या या लोकसंख्या नियंत्रण धोरणानुसार दोनपेक्षा जास्त अपत्य असलेल्या लोकांना सरकारी नोकरी किंवा योजनांचा लाभ घेता येणार नाही. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूकही लढता येणार नाही, असेही या धोऱणात सांगण्यात आले आहे. या धोऱणावर आता विविध स्तरातून टीका होते आहे. निवडणुकीच्या तोंडावर योगींनी हे धोरण आणल्याची टीका याआधी समाजवादी पक्षाने केली आहे.