युक्रेन रशियामधील भारतीयांना मायदेशी परत आणा, जयंत पाटलांची पंतप्रधान मोदींना विनंती

Update: 2022-02-20 10:37 GMT

सध्या युक्रेन आणि रशियामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.रशियाकडुन युद्ध छेडलं जाण्याची दाट शक्यता आहे.असं दावा खुद्द युक्रेनकडुनचं करण्यात आला होता.त्यावरचं आता राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदी यांना विनंती केली आहे.

युक्रेनमधील भारतीयांना मायदेशी परत आण्ण्यासंदर्भात जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनंती केली आहे. रशिया आणि युक्रेन या देशात युद्धजन्य़ परिस्थिती निर्माण झाली आहे.या भागात १८ हजारपेक्षा जास्त भारतीय अडकलेले आहेत.त्यात विद्यार्थांची संख्या जास्त आहे.त्यांना मदत हवी आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थांच्या सुरक्षिततेवर लक्ष द्या,आणि यासाठी योग्य तो निर्णय लवकरात लवकर घ्या अशी विनंती त्यांनी केली आहे.

युक्रेनच्या लष्कराने युद्ध सुरु झाले असल्याचे पत्र काढून नागरिकांना सतर्क केले आहे.तर रशियातील बंडखोरांनीही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने घराबाहेर पडु नका असे सांगितले आहे.याच परिस्थितीत जयंत पाटील यांनी अडकलेले विद्यार्थी हे आपले भवितव्य असून त्यांना लवकरात लवकर मायभूमीत परत आणण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन केलं आहे.

भारतीय दुतावासानं ही युक्रेनमध्ये सध्या वास्तव्यास असलेल्या भारतीयांना सुरक्षेच्या कारणास्तव मायदेशी परतण्याचं आवाहन केलं आहे.सध्याची परिस्थिती पाहता ज्या विद्यार्थ्यांना इथं राहणं गरजेचं त्यांनी तात्पुरतं मायदेशी परतावं त्याचबरोबर भारतीय नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की युक्रेन अतंर्गत सर्व प्रकारचे अनावश्यक प्रवास टाळावेत.भारतीय नागरिकांनी त्यांच्या युक्रेनमधील वास्तव्याबाबत भारतीय दुतावासाला माहीती द्यावी.यामुळे दुतावासाला भारतीयांना सर्व प्रकारची आवश्यक ती सुविधा पुरविण्यात येईल,असं भारतीय दुतावासाने जारी केलेल्या संदेशपत्रात म्हटलं आहे.

Tags:    

Similar News