"विनाशकाले विपरीत बुध्दी", गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रीया

Update: 2022-10-09 06:47 GMT

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी केंद्रीय निवडणुक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण हे गोठवलं आहे. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील प्रतिक्रीया दिली असून उध्दव ठाकरेंसाठी त्यांनी विनाशकाले विपरीतबुध्दी म्हटलं आहे.

निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला तातडीने बोलावलं आहे. ७ वाजता पक्षाची बैठक आहे. निरोप आल्य़ामुळे दुपारीच मी सुध्दा मुंबईकरता रवाना होत आहे. सर्व आमदार, खासदार, नेते आम्ही सगळे उपस्थित राहणार आहोत. या बैठकीत कोणतं चिन्ह मागुन घ्यावं असा निर्णय होईल असं ते म्हणाले.

शिवाय साऱ्या गोष्टींचा सारासार विचार करून आम्ही आमचा प्लॅन बी आधीच तयार करून ठेवला आहे. आमची सर्व तयारी झाली आहे. सर्व नेते, पदाधिकारी आणि जनमताचा विचार केला तर धनुष्यबाम हे चिन्ह आमच्याकडेच राहिल. असंही गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.

योग्यवेळी निर्णय घेतला असता तर हे सगळं थांबवता आलं असतं आता वेळ निघून गेली असं वाटतं का? या पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, आम्ही सांगत होतो त्यावेळेला की एकनाथ शिंदे यांना तुम्ही पुन्हा बोलवा, शिवाजी महाराजांनी केला होता तसा तह करा असं आम्ही त्यांना सांगितलं होतं. ४० आमदारांना थांबवण्यासाठी एकनाथ शिंदे यांना परत बोलवणं हे योग्य होतं पण ते असं करू शकले नाही. शिवाय राजीनामा द्यायचा नव्हता राजीनामा दिला. मुलाला बोलु द्यायचं नव्हतं त्याला बोलण्यासाठी अंगावर सोडलं. विनाशकाले विपरीत बुध्दी असंच आपल्याला म्हणावं लागेल. आपल्याकडे केजरीवाल यांचं उदाहरण आहे. त्यांचे आमदार संपर्काबाहेर होते त्यांनी आपल्या आमदारांना परत बोलावलं. हेमंत सोरेन यांनी आपल्या आमदारांना शांत केलं. पण आपल्याकडे असं काही झालं नाही. अशी प्रतिक्रीया गुलाबराव पाटील यांनी दिली.

Tags:    

Similar News