मनोज जरांगेच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देत मंत्री भुजबळ यांनी दिली प्रतिक्रिया. काय म्हणाले वाचा

Update: 2024-02-10 05:02 GMT

ओबीसी आणि मराठा यांच्यातील आरक्षण वादात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंडल आयोगाला आव्हान करण्याचे वक्तव्य नाशिकमधून केले होते. या त्यांच्या आव्हानाला जवाब देत ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या या मागणीला जाहीर पाठींबा आहे. एका बाजूला झुंडशाही आणि दुसऱ्या बाजुने मागच्या दरवाजाने प्रवेश करणे याला आमचा विरोध आहे. ओबीसी आरक्षण मंडळ हा आयोगाचा भाग आहे. जर आयोगच गेला तर त्यांचे आरक्षण कसे राहील ? असा सवाल भूजबळांनी उपस्थित केला आहे.


मुंबईतील दहिसर परिसरातील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, लोकांच्या डोक्याला झालंय काय ? मला कळत नाही, फेसबुक लाईव्ह करतात आणि बिनधास्त गोळ्या झाडतात, अशा घटना घडत आहेत. यामध्ये पोलीस प्रशासन तरी काय करणार, कारण चोऱ्या, दंगल, लुटमार अशा घटनांमध्ये पोलीस संरक्षण देत असतात, इथं तर तुमच्या घरात येऊन घटना घडत आहेत. पोलीसांनी बंदूक लायलन्स देताना अधिक काळजी घेतली पाहीजे, असे त्यांनी म्हटले आहे.

Tags:    

Similar News

Kamla ahead of Trump?