प्रकल्प गुजरातला गेल्याचे पाप महाविकास आघाडी सरकारचे :उद्योग मंत्री उदय सामंत

वेदांत आणि एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात राहण्यासाठी महाविकास आघाडीने कुठलीही प्रयत्न केले नाही आता मात्र राजकारण करायचे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टारगेट करत असल्याचा आरोप उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला.;

Update: 2022-10-29 13:53 GMT

वेदांता आणि एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात राहण्यासाठी महाविकास आघाडीने कुठलीही प्रयत्न केले नाही आता मात्र राजकारण करायचे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टारगेट करत असल्याचा आरोप उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उद्योग मंत्री सामंत यांनी ठाणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जोरदार प्रत्युत्तर दिले. सामंत म्हणाले, 'एअरबस आणि वेंदाता प्रकल्पाबाबत काही कागदपत्र आहेत. महाविकास आघाडीवर प्रकल्प जाण्यासाठी जबाबदार आहेत. दोन्ही प्रकल्प महाराष्ट्रातच राहावेत, यासाठी महाविकास आघाडी सरकारने कोणतेही प्रयत्न केले नसल्याचा आरोपही केला.

आदित्य ठाकरे यांना सरकार गेल्यानंतर राग असू शकतो. पण राग किती काढायचा? यालाही बंधने आहेत. एअरबसच्या बाबात सरकारची बैठक झालीच नाही. स्थानिक अधिकाऱ्यांबरोबर चर्चा सुरु होती, असे आयएस अधिकारी सांगू शकतो. असेही यावेळी सामंत यांनी सांगितलं.

सरकार घटनाबाह्य आहे, कृषीमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, उद्योगमंत्र्यांनी राजीमाना दिला पाहिजे असे आरोप करत आदित्य ठाकरे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेलाच विरोध केला आहे. राजीमाना मागण्यापर्यंतचे राजकीय आरोप मी समजू शकतो. पण आदित्य ठाकरे फक्त बोलत आहेत, त्यांच्याकडे पुरावे नाहीत. त्यांनी कागदपत्र द्यावीत, असे उदय सामंत म्हणाले.

एअरबसच्या संदर्भात महाविकास आघाडी सरकारची टाटासोबत झालेल्या बैठकीतील पुरावे महाराष्ट्राच्या जनतेसमोर सादर करावेत, अशी विनंती केली होती. माझ्या विनंतीला मान देऊन आदित्य ठाकरे महाराष्ट्राच्या जनतेला काही कागदपत्र देतील असं वाटलं होतं. पण ही सर्व पत्रकार परिषद ऐकल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेसमोर काही कागदपत्र सादर करत आहे.

एप्रिल 2020 मध्ये ज्या ठिकाणी मिहान प्रकल्प होतोय, त्या ठिकाणीच पूर्वीपासून टाटाची एक कंपनी कार्यरत आहे. त्या टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यानं एअरबससाठी लागणारी जागा, मिहानमध्ये मिळेल का? अशी चौकशी त्यावेळी त्यांनी केली होती. आयएएस अधिकारी दिपक कपूर याबाबत सविस्तर सांगू शकतात.

एअरबस प्रकल्प नागपूरमधील मिहानमध्ये आणण्यासाठी त्यावेळी महाराष्ट्र सरकारकडून कोणतेही प्रयत्न झाल्याची कागदपत्रे नाहीत, असे सामंत म्हणाले. त्यावेळी विरोधी पक्ष नेते असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प नागपूरला आणण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले होते. त्यावेळी महाराष्ट्र सरकारनं कोणता पुढाकार घेतला? एअरबसच्या किती बैठका घेतल्या? किती पत्रव्यवहार केला? कुणाबरोबर बैठका घेतल्या? मुख्यमंत्री आणि उदयोगमंत्र्यांनी किती बैठका घेतल्या? याची कागदपत्रे आज महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षित होती. ती कागदपत्रे मिळाली नाहीत, असे सामंत म्हणाले.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर 15 जुलै 2022 पासून एका महिन्यात वेदांतासाठी सहा बैठका झाल्या होत्या. वेदांता आणण्यासाठी 38 हजार कोटींची पॅकेज द्यायचं होतं. त्यासाठी हायपॉवरची मागील सहा महिन्यात कोणतीही बैठक झाली नव्हती. याचे एमआयडीसीकडून आलेले पुरावे सामंत यांनी दिले.

अनिल अग्रवाल मुंबईला आलेले असताना देवेंद्र फडणवीस त्यांना भेटले होते, पण तोपर्यंत उशीर झाला होता, तरी त्यांनी विनंती केली होती. मागच्या अडीच वर्षात जे जे एमओयू झाले पण कारवाई झाले नाही ते 74 प्रकल्प याची लिस्ट माझ्याकडे आहे. पण एमओयू झाल्यानंतर कॅबिनेटची सब कमिटी बैठक होणे आवश्यक होते, ती 14 महिने झालीच नाही, असे सामंत म्हणाले. मी दोनच मुद्दे सांगत आहे, हाय पॉवर कमिटीची बैठक का नाही झाली? सब कमिटीची बैठक का नाही झाली? याची उत्तर विरोधकांनी द्यावीत.

बिडीपी चा प्रकल्प कुठेही गेला नाही, तो रायगड मध्येच होणार आहे. मेडिकल डिव्हाईस पार्क प्रकल्प गेला असे देखील म्हटले गेले, ओरिकला किती जण गेले माहीत नाही, पण ही सिटी समृद्धी महामार्गापासून फक्त नऊशे मीटरवर आहे, तो रस्ता बनवणे अशी मागणी केली होती ती पूर्ण झाली नाही. मी तिकडे गेलो आणि त्यांची मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आणि तो रस्ता मंजूर करुन घेतला.

रिफायनरी बाबत देखील आज माजी उद्योग मंत्री म्हणाले की आम्ही तो प्रकल्प आणला, ते बरे झाले, आता तिथे जे स्थानिक आमदार आहेत त्यांना एकदा विचार की तो प्रकल्प त्यांना मान्य आहे का? तर त्यांचा खूप या प्रकल्पाला मोठा विरोध आहे. उध्दव ठाकरे यांचा नाणार रिफायनरीला विरोध होत त्यामुळे एका दिवसात नोटिफाय केले गेले, जो प्रकल्प 3 लाख कोटींचा होता तो 1 लाख 40 हजार कोटींचा झाला. आता तो कमी का झाल? हे पण त्यांना विचारायला हवं, असे सामंत म्हणाले.

मी राष्ट्रवादीमधून शिवसेनेत आलो. त्यामुळे शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी माझ्यावर टीका करायला हवी होती, त्यावेळी म्हटले नाही खोके घेऊन गेले, पण त्यांनी काही टीका केली नाही. कधी मला गद्दार म्हणाले नाही, मी इतिहासात पहिल्यांदा रत्नागिरी येथून शिवसेनेचा आमदार निवडून आलेला चालतो, असे सामंत म्हणाले. युवासेना सचिवांनी ट्विट करून आम्हाला प्रश्न विचारू नये. आदित्य ठाकरे वरळीत असून शेताच्या बांधावर का जातात? हा त्यांचा प्रश्न अहे. त्यामुळे मी कोणाविषयी बोलावे हा माझा प्रश्न आहे, युवा सेना सचिवांनी आधी ग्रामपंचायत लढवून दाखवावी त्यानंतर आरोप करावे, असा टोलाही सामंत यांनी लगावला.

Tags:    

Similar News