सात-आठ महिन्यात महापालिकेच्या निवडणुका लागतील त्यामुळे जनतेपर्यंत जायला पाहिजे म्हणून भिवंडीला गेलो होतो ,गेल्या पाच दहा वर्षात असा प्रतिसाद मिळाला नव्हता ,आज डोंबिवलीत आलो डोंबिवलीचा अनुभव माझा काही चांगला नव्हता म्हणून डोंबिवलीत यायला टाळायचो डोंबिवलीत राष्ट्रवादीची ताकद नव्हती आज आलो चांगलं वाटलं ,कार्यकर्त्यांची गर्दी आहे हे सर्व पाहून चांगलं वाटलं. ही गर्दी पाहून आर आर पाटील यांच्याकाळातील कार्यकर्त्यांच्या उत्साहाची आठवण झाल्याचे आव्हाड म्हणाले. दरम्यान आयत्या वेळी घोटाळा नको म्हणून प्रत्येक प्रभागात स्वबळाची तयारी सूरु केल्याचं राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान जावेद अख्तर यांच्या विधानावर भाष्य करताना आव्हाड म्हणाले की, प्रत्येकाला वैचारिक स्वातंत्र्य आहे,त्यामुळे जावेद अख्तर बोलले याबाबत काही आश्चर्य वाटल नाही अशी प्रतिक्रिया दिली.
आव्हाड यांनी माजी खासदार आंनद परांजपे यांनी बीएसयूपी घोटाळा बाहेर काढला होता, मात्र त्याकडे कुणी लक्ष दिलं नाही आजही लाभार्थी घरांच्या प्रतिक्षेत आहेत म्हणून जगन्नाथ शिंदे जे बोलले ते बरोबर आहे ,बीएसयूपी प्रकल्पातील घरे लाभार्थ्यांना दिली जात नाहीत असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
दरम्यान जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाची परिस्थिती सर्वजण बघत आहेत, ऑक्सिजन, कोरोना प्रतिबंधक लस, बेड यासाठीची सर्वांचीच धावपळ सुरू आहे मात्र या सगळ्यात महाविकास आघाडी सरकार हे महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या मागे खंबीरपणे उभी आहे असं आव्हाड म्हणाले. कोरोनाची तिसरी लाट आपल्याकडे येऊ नये यासाठी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे असं त्यांनी सांगितले.
मात्र एकीकडे नागरिकांनी कोरोनाची नियमांचे पालन करण्याचा सल्ला देताना दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्ता मेळाव्यात झालेल्या गर्दीवरून चर्चा सुरू आहे. सर्वसामान्यांना गर्दी करू नका सांगताना दुसरीकडे राजकीय पक्षच मोठं मोठ्या सभा, मेळावे घेत असल्याने टीका होताना दिसत आहे.