सुप्रीम कोर्टाकडून फोन आल्यानंतर कॉमेडियन मुनावर फारुकीची इंदूर तुरूंगातून सुटका
सुप्रिम कोर्टानं आदेश देत कॉमेडियन मुनावर फारुकीला जामीन दिल्यानंतरही इंदूर तुरुंग अधिकाऱ्यांनी फारुकीला सोडण्यास नकार दिल्याचे आता उघड झाले आहे. कोर्टाचा लेखी आदेश हवा असा हट्ट धरलेल्या तरुंगअधिकाऱ्यांना अखेर रात्री उशिरा सुप्रिम कोर्टाकडून फोन गेला आणि तुरुंगाधिकाऱ्यांना सुप्रिम कोर्टाच्या वेबसाईटवरील ऑर्डर पहायला सांगून मुनावर फारुकीला सोडण्यास सांगितले, त्यानंतर सुटका झाली.;
शुक्रवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयाने मुनावर फारुकीला अंतरिम जामीन मंजूर केला होता. परंतू दिवसभर आदेश न मिळाल्याचे सांगत इंदूर तुरुंग प्रशासनानं फारुकीला सोडण्यास नकार दिला होते. सुप्रिम कोर्टाच्या त्या एका फोननंतर कॉमेडियन मुनावर फारुकीला शनिवारी रात्री उशिरा इंदोर तुरूंगातून सोडण्यात आले.मध्य प्रदेशातील तुरुंग प्रशासनाने सुरुवातीला उत्तर प्रदेशातील फारुकीविरूद्ध दाखल केलेल्या एफआयआर संदर्भात स्पष्टतेचा अभाव असल्याचे सांगून फारूकची सुटका करण्यास नकार दिला होता.
तुरुंग अधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेशमधील फारुकीच्या विरोधात एफआयआर संदर्भात त्यांना उत्तर प्रदेशातील संबंधित कोर्टाकडून कोणताही आदेश मिळालेला नाही अशी भुमिका घेतली होती. अखेर इंदूर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांना शनिवारी रात्री उशिरा सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी कोर्टाच्या संकेतस्थळावर अपलोड केलेला आदेश तपासण्यासाठी व त्याला सोडण्यासाठी निर्देश मिळाला.
माजी गृहमंत्री आणि कॉंग्रेस नेते पी.चिदंबरम यांनी सुप्रिम कोर्टानं जामिनाचा आदेश दिल्यानंतर ३० तास होऊनही तुरुंगाधिकारी सोडत नाहीत मध्यप्रेशचे मुख्यमंत्री आदेश देत आहेत का? असा प्रश्न पी.चिंदबरम यांनी उपस्थित केला.
यह आदेश पारित हुवे लगभग 30 घंटे हो चुके हैं। फिर भी, मध्य प्रदेश पुलिस और जेल अधिकारियों द्वारा आदेश को कम आंका जा रहा है।
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) February 6, 2021
क्या यह सब म.प्र. के मुख्यमंत्री के संज्ञान में है या बिना उनके जानकारी के हो रहा है?
कल सुबह सुप्रीम कोर्ट द्वारा अंतरिम जमानत के आदेश के बावजूद मुनव्वर फारुकी को अब तक जेल से रिहा क्यों नहीं किया गया?
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) February 6, 2021
एका स्टॅंड-अप शो दरम्यान त्याने हिंदू देवतांविरूद्ध अवमानकारक टिप्पणी केल्याच्या आरोपावरून फारुकीला 1 जानेवारी रोजी मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केली होती. यासंदर्भात हिंदुत्ववादी संघटना हिंद रक्षक संघटनेचे प्रमुख एकलव्य सिंह गौर यांनी तक्रार दिली होती.यापूर्वी सत्र न्यायालय आणि त्यानंतर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने २८ जानेवारी रोजी फारुकीची जामीन याचिका फेटाळली होती. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला तसेच स्वतंत्र प्रकरणात फारुकीविरूद्ध उत्तर प्रदेश पोलिसांच्या वॉरंटला स्थगिती दिली.