आम्ही तीनही राजे एकत्रच आहोत; मराठा आंदोलकांनी ५ तारखेपर्यंत शांत राहावं - खासदार संभाजीराजे

५ तारखेला मराठा आरक्षणाबाबत अंतिम सुनावणी सुरू होणार असून पुढे काय होत ते बघू आंदोलकांनी शांत राहावं. मराठा समाजातील सर्व नेत्यांची भूमिका एक आहे. वेगळी भूमिका मांडतात याचा अर्थ ते वेगळे आहेत असा होत नसल्याचे खासदार संभाजीराजे यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले.;

Update: 2021-01-31 10:18 GMT

मराठा समाज आता पुन्हा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. तरी येत्या ५ तारखेला मराठा आरक्षणा संबंधात अंतिम सुनावणी सुरू होणार असून पुढे काय होत ते बघू आंदोलकांनी शांत राहावं. जर आंदोलन अजून मागे घेतले नसेल तर ते मागे घ्यावे. मराठा समाजातील सर्व नेत्यांची भूमिका एक आहे. वेगळी भूमिका मांडतात याचा अर्थ ते वेगळे आहेत असा होत नाही. समाजाच्या हितासाठीच सर्वजण भूमिका घेतात. आम्ही तीनही राजे एकत्रच आहोत.

जेजुरीचा कार्यक्रम पूर्वनियोजित असल्यामुळे मी साताऱ्यातील कार्यक्रमास जाऊ शकलो नाही. उदयनराजे व आमचं उद्दिष्ट एकच आहे. ते त्यांची भूमिका मांडतात व मी माझी भूमिका मांडत असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी आज पुण्यात आयोजित महाएक्स्पो कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना सांगितले.

Full View

कोल्हापूर विमानतळस राजाराम महाराजच नाव देण्याच्या मुद्यावर बोलताना त्यांनी राजाराम महाराजांनी कोल्हापूरचे विमानतळ सुरू केलं. महाराष्ट्र सरकारने राजाराम महाराजांचं नाव या विमानतळाला देण्यात यावे यासाठी केंद्र सरकारला शिफारस केली असून माझा देखील पाठपीरावा चालू आहे. लवकरात लवकर नामांतर व्हावं अशी माझी इच्छा व्यक्त करत औरंगाबादच्या नामांतराबाबत देखील त्यांनी संभाजी महाराजांचे नाव देण्यात काही चुकीचं नसल्याचे म्हंटले.

दिल्ली येथील शेतकरी आंदोलनावर बोलताना त्यांनी, शेतकऱ्याचे प्रश्न प्राधान्याने घेतले पाहिजेत. शेतकरी हा केंद्रबिंदू असून त्यांच्यामुळे आपण जगतो. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणताही त्रास व्हावा ही आपली भूमिका नाही ते कोणत्या पक्ष्यातील आहेत हे महत्त्वाचे नसून शेतकरी हे शेतकरी आहेत. त्यामुळे सत्तेत असणाऱ्यांनी व नसणार्यांनी देखील त्याकडे लक्ष दिलं पाहिजे पण कुणी कायदा हातात घेऊ नये असं ते म्हणाले.

Tags:    

Similar News