MPSC प्रमाणे या उमेदवारांचीही अवस्था, पुण्यात जोरदार निदर्शने

Update: 2021-07-05 16:46 GMT

पुणे: स्वप्नील लोणकर याच्या आत्महत्येनतर राज्यात MPSC पास झालेल्या उमेदवारांच्या नियुक्त्याच ३१ जुलैपर्यंत करण्याची घोषणा सरकारने केली. पण पुण्यात गेल्या 12 दिवसांपासून पीएमपीएमएलच्या स्वारगेट येथील कार्यालयासमोर असेच एक आंदोलन सुरू आहे. त्याची दखल अजूनही घेतली गेलेली नाही. वाहक पदासाठी पात्र ठरलेल्या पण नियुक्ती न मिळालेल्या उमेदवारांचे हे आंदोलन आहे. 2016 साली पीएमपीएमलने (PMPML) वाहक पदासाठी ज्या उमेदवारांची भरती केली होती, त्यांना अजूनपर्यंत नियुक्त्या मिळालेल्या नाहीत. त्यामुळे राज्य परिवहन मंडळाने लवकरात लवकर या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरु आहे.

पीएमपीएमएलने 2016 साली 4900 वाहक पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली होती. 1 जुलै 2017 ला यासाठीच्या परीक्षा पार पाडल्या. भरती प्रक्रिया टप्याटप्याने राबविण्यात आली. पहिल्या टप्प्यात 261 दुसऱ्या टप्प्यात 400 उमेदवार पात्र ठरले. असे एकूण 661 उमेदवार वाहक म्हणून रुजू झाले. थोड्या दिवसांनी तिसरी प्रतीक्षा यादी जाहीर झाली. यात 1784 उमेदवारांच्या यादीचा समावेश होता. मात्र 2019 मध्ये देशात लॉकडाऊन लागला. त्यामुळे ही यादी थांबवली गेली. त्यांनंतर या विद्यार्थ्यांची नियुक्ती प्रक्रिया पूर्णपणे रखडलेली आहे. त्यातच आता तिसरी यादी रद्द करुन नवीन यादी तयार करण्याची चर्चा असल्याचे हे उमेदवार सांगत आहेत. त्यामुळे ही यादी रद्द न करण्याची मागणीही या आंदोलकांनी केली आहे.

Tags:    

Similar News