Manoj jarange Live | आरक्षण मिळल्याशिवाय मागे हटणार नाही

Update: 2023-10-19 10:51 GMT

मनोज जरांगे पाटील यांनी आज नवी मुंबईतील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

दरम्यान यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की “आम्ही सरकारला 24 ऑक्टोबर पर्यंत वेळ दिला असून, निर्णय न झाल्यास 22 ऑक्टोबरला पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करेन, मात्र मला खात्री आहे की सरकार यावर योग्य निर्णय घेईल. आता मी मराठा समाजाच्या लोकांना भेटत आहे. कुणाचे बाले किल्ले नाहीत, सगळ्याचे बाले किल्ले आहेत, जिथे जिथे मराठा आहेत, तिथे तिथे आम्ही जाणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले यावेळी सांगितले

Full View

Tags:    

Similar News