मनोज जरांगे यांचा पुणे-मुंबई दौरा, १० फेब्रुवारीला आमरण उपोषण सुरु करणार
Jalna : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे उपोषणापूर्वी पुणे आणि मुंबई दौरा करणार आहेत. ते 7 फेब्रुवारीला आळंदी आणि 8 फेब्रुवारीला मुंबईत कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. 10 फेब्रुवारीला ते अंतरवाली सराटीत पोहोचणार आणि 11 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरु करणार आहेत. मराठा आरक्षण आंदोलक यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीत यापूर्वी दोनदा आमरण उपोषण करुन सरकारकडून आपल्या मागण्या मान्य करुन घेतल्या होत्या. आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी अंतरवाली सराटी ते मुंबई असा मोर्चा देखील काढला.
राज्य सरकारनं काढलेल्या अधिसूचनेनंतर २७ जानेवारीला मनोज जरांगे यांनी नवी मुंबईत विजयी गुलाल देखील उधळला होता. आपल्या मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी २० जानेवारीपासून जालन्यातील अंतरवाली सराटीतून मुंबईपर्यंत पदयात्रा काढली होती. ते २६ जानेवारीला मुंबईतील आझाद मैदान येथे आमरण उपोषण करणार होते. मात्र, नवी मुंबईत मोर्चा दाखल झालेला असताना सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना अधिसूचनेचा मसुदा सुपुर्द केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मनोज जरांगे यांनी आपले उपोषण वाशीतच सोडले होते.
अधिसूचनेची तातडीने अंमलबजावणी मागणी
मराठा आरक्षणासाठी काढलेल्या अधिसूचनेची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी आणि मराठा समाजाच्या इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणापूर्वी ते आळंदी (पुणे), मुंबई, नाशिक, बीड या जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. मनोज जरांगे हे आळंदी आणि मुंबई दोन दिवसांचा दौरा करणार असून ते आज अंतरवली सराटी वरून १२ वाजता निघणार आहेत.
जरांगे यांच्या दौरा कार्यक्रम
6 फेब्रुवारी: अंतरवाली सराटीतून निघून आळंदीला प्रस्थान
7 फेब्रुवारी: आळंदी येथे स्वागत कार्यक्रम
8 फेब्रुवारी: मुंबईतील कामोठे येथे कार्यक्रम आणि समाजाच्या लोकांशी बैठक
9 फेब्रुवारी: नाशिक आणि बीडमधील कार्यक्रम
10 फेब्रुवारी: आमरण उपोषण सुरु करणार
मनोज जरांगे यांनी 20 जानेवारीपासून जालन्यातील अंतरवाली सराटीतून मुंबईपर्यंत पदयात्रा काढली होती. 26 जानेवारीला ते मुंबईतील आझाद मैदान येथे आमरण उपोषण करणार होते. मात्र, सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्यामुळे त्यांनी उपोषण मागे घेतले. आता ते अधिसूचनेची अंमलबजावणी आणि इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी पुन्हा उपोषण करणार आहेत. मनोज जरांगे यांच्या उपोषणामुळे राज्य सरकारवर दबाव येण्याची शक्यता आहे. सरकारकडून मराठा समाजाच्या मागण्यांवर काय निर्णय घेतला जातो हे पाहणे आता महत्वाचं ठरणार आहे.