मनोज जरांगे पाटील यांनी अभ्यास वाढवावा- नारायण राणे

Update: 2023-10-19 11:01 GMT

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे. त्यावर नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांना चांगलाच टोला लगावला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. तर हे आरक्षण सरसकट देण्यात यावे, असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. त्यावरून नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांनी अभ्यास वाढविण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, राज्यातील मराठा समाजाने सरसकट आरक्षण देण्याची मागणी कधीच केली नाही. राज्यातील कुणबी मराठा समाजाने मागणी केली आहे. त्यानुसार त्यांना आरक्षण देण्यात यावे. मात्र मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची जी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे ती चुकीची आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अभ्यास वाढवण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

राणे पुढे म्हणाले, राज्यातील 96 कुळी मराठा समाजाने आरक्षणाची कधीच मागणी केली नाही. मी 96 कुळी मराठा आहे. मी कधीच आरक्षणाची मागणी केली नाही. त्यामुळे कुणबी मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. पण सरसकट आरक्षण देण्यात येऊ नये, असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

Tags:    

Similar News