अंतरवली सराठी - मराठा आरक्षणाला घेऊन मनोज जरांगे पाटील आता आक्रमक भूमिकेत आले आहे. वीस तारखेला मुंबईमध्ये आंदोलनासाठी जाणारच हा आक्रमक पवित्रा जरांगे पाटील यांनी घेतला आहे. यादरम्यान काही निष्क्रिय मराठा नेत्यांकडून माझ्यावर ट्रॅप रचला जात आहे. अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयाला घेऊन येत्या वीस जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील पैदल लॉंग मार्च घेऊन मुंबईकडे जाणार आहे. या पुढे मुंबईमध्येच मराठा आरक्षणा साठी आंदोलन उभे करणार आहेत असे देखील जरांगे पाटील यांनी सांगितले. सरकारला वीस जानेवारी पूर्वी आरक्षण जाहीर करा अन्यथा मुंबईमध्ये येऊन आमरण उपोषण करणार असल्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी दिले होते. या घटनेला अवघे काही तास बाकी असताना पत्रकारांशी बोलत्या वेळेस मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट सांगितले की, वीस तारखेला मुंबईमध्ये येऊन आंदोलन आम्ही करणारच आहोत. मात्र या आंदोलनादरम्यान आंदोलनाला गालबोट लावून माझ्यावर ट्रॅप रचण्याचा प्रयत्न काही मराठा समाजातीलच निष्क्रिय नेत्यांनी केला आहे.
वीस तारखेला आंदोलन सुरू झाल्यानंतर त्याच्या पुढील दोन दिवसातच माझ्यावर ट्रॅप लावणाऱ्या मराठ्या नेत्यांचं मी नाव जाहीर करणार आहे. असा सूचक इशारा मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिला.