पहा मालदीवच्या खासदारांचं एकमेकांशीच भांडण; संसदेचे काम पडलं ठप्प
एका व्हिडिओमध्ये PNC खासदार अब्दुल्ला शाहीम अब्दुल हकीम MDP खासदार इसा यांच्यात भांडण झाल्याचे पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये दोघेजण एकमेकांचे कपडे ओढताना दिसत आहेत.
मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टी (MDP) खासदार इसा हे सत्ताधारी पीपल्स नॅशनल काँग्रेस (PNC) खासदार अब्दुल्ला शाहीम अब्दुल हकीम यांच्याशी भांडत असल्याचे व्हिडिओंसह सदस्यांमध्ये हाणामारी झाल्याने मालदीव संसदेचे कामकाज रविवारी ठप्प झाले.
*Viewer discretion advised*
— Adhadhu (@AdhadhuMV) January 28, 2024
Parliament proceedings have been disrupted after clashes between PPM/PNC MPs and opposition MPs. pic.twitter.com/vhvfCBgQ1s
मालदीवमधील अधाधू ( Adhadhu) या ऑनलाइन वृत्तवाहिनीने शहीमने इसाचा पाय पकडला आणि दोघे एकत्र पडताना दाखवले, तर इसा शहीमच्या मानेला लाथ मारताना आणि केस ओढताना दिसत आहे.
विडिओ मध्ये इतर सदस्य शहीमला परिसरातून बाहेर ढकलताना दिसत आहेत. एका संसद सदस्याला दुखापत झाल्यानंतर रुग्णवाहिकेत उपचारासाठी नेण्यात आले, अशी माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे.