APMC Election : गुलाबराव पाटलांना धक्का; जळगाव बाजार समितीत महाविकास आघाडीची सत्ता

गुलाबराव पाटलांना धक्का; जळगाव बाजार समितीत महाविकास आघाडीची सत्ता;

Update: 2023-04-30 15:03 GMT

राज्याच लक्ष लागून असलेल्या जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखालील महाविकास पॅनलने 12 जागावर विजय मिळवला आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात भाजप सेना युतीच्या पॅनल सहा जागा मिळाल्या आहेत.

गुलाबराव पाटील यांचा मतदार संघ असलेल्या धरणगाव बाजार समितीत गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात लढलेल्या भाजप सेना पॅनलने आपल्याकडे सत्ता ठेवण्यात यश मिळाल्याने पाटील यांना दिलासा मिळाला आहे. धरणगाव बाजार समितीत राष्ट्रवादीचा एक गट भाजप सेनेच्या बाजूने होता. यामुळे 12 जागा जिंकून गुलाबराव पाटील यांनी बाजी मारली. आहे. महाविकास आघाडीला सहा जागा मिळाल्या आहेत.

गुलाबराव पाटील यांना धरणगाव मिळाल्याने 'कभी खुशी', तर जळगावची सत्ता गेलताने 'कभी गम' अशी परिस्थिती झाली आहे.

विशेष म्हणजे जळगाव बाजार समितीत गुलाबराव पाटील यांचे निकटवर्तीयांचाच पराभव झाला आहे. भाजप फायद्यात राहिला आहे. गेल्या वेळी गुलाबराव पाटील यांचीच सत्ता जळगाव बाजार समितीत होती. आता महाविकास आघाडीची सत्ता बसणार आहे. यामुळे गुलाबराव पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये राजकीय समीकरण बडणार असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहे.

Tags:    

Similar News