सत्तासंघर्षाच्या निकालाची तारीख ठरली, मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा कुणाला?
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल 11 मे रोजी लागण्याविषयी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी मोठे संकेत दिले आहेत.;
Supreme court verdict : येत्या दोन दिवसात सत्ता संघर्षाचा निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यातच सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एका सुनावणीदरन्यान महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल लागण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान यावर प्रसारमाध्यमांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा देत सस्पेन्स कायम ठेवला.
राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे मुख्यमंत्री पद जाईल, अशी चर्चा आहे. त्यातच आता सत्तासंघर्षाचा निकाल लागण्याबाबत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Chief Justice) यांनी भाष्य केले. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना प्रश्न विचारला. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव इथं आले होते. जळगाव जिल्ह्यातील चोपडा चे शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे यांच्या कन्येच्या विवाह निमित्त जळगाव असताना प्रसारमाध्यमांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला. त्यावर प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फारशी काही प्रतिक्रिया न देता फक्त 'सर्वांना शुभेच्छा' एवढीच प्रतिक्रिया दिली. सर्वांना शुभेच्छा या प्रतिक्रिया वरून मुख्यमंत्र्यांनी नेमक्या शुभेच्छा कोणाला दिल्या, अशी आता चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदें बरोबर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते.