राज्य लॉकडाऊन होणार, टास्क फोर्सच्या बैठकीत निर्णय, किती दिवसांचं असणार लॉकडाऊन?
राज्य लॉकडाऊन होणार, टास्क फोर्सच्या बैठकीत निर्णय, किती दिवसांचं असणार लॉकडाऊन?;
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाची ही चैक ब्रेक करण्यासंदर्भात १० एप्रिल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व पक्षीय बैठकीत "कोरोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील. आपल्याला प्रथम जीव वाचविण्याला प्राधान्य द्यावे लागेल. ही जर आरोग्याची आणीबाणी असेल तर प्राधान्य हे नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला असले पाहिजे," अशी भूमिका मांडली होती. त्यामुळे राज्यात येत्या एक ते दोन दिवसात लॉकडाऊनची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच लॉकडाऊन कधी आणि किती दिवस लागणार याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोव्हिड टास्क फोर्स समितीच्या बैठकीनंतर जाहीर करणार आहे.
मुंबईत ही बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत भाग घेणाऱ्या एका सदस्यांनी आजतक वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत काही लोकांचं राज्यात लॉकडाऊन लावण्यात यावं. असं मत आहे. लोकांना नियम पाळताना खूप अडचणी येत आहेत. तसंच या मिटींगमध्ये सहभागी झालेल्या काही डॉक्टर्स आणि राजकीय नेत्यांनी राज्यात १४ दिवस लॉकडाऊन लावण्याचा सल्ला दिला आहे. ज्यामुळे कोरोनाची चैन ब्रेक केली जाऊ शकते.
असं या सदस्यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.
मात्र, स्वत: मुख्यमंत्री १४ दिवसांऐवजी ८ दिवसांचा लॉकडाऊन लावण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे राज्यात किती दिवसांचा लॉकडाऊन लागणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.