सोमय्या व्हिडीओचे विधानपरिषदेत पडसाद

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी सभापतींकडे किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडिओचा पेनड्राइव्ह सादर केला असून किरीट सोमय्यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओच्या चौकशीची केली मागणी दिली आहे.;

Update: 2023-07-18 08:52 GMT

काही भाजप नेत्यांनी ईडी, सीबीआयची भीती दाखवून अनेक महिलांना ब्लॅकमेल केले आहे. या नेत्याला सीआयएसएफची सुरक्षा आहे. या सुरक्षेचा वापर महिलांना ब्लॅकमेल करण्यासाठी केला जातो. काही महिलांच्या मजबुरीचा फायदा घेतला जातो. माझ्याकडे  या देशद्रोही नेत्यांच्या व्हिडिओचा आठ तास फुटेज असलेले पेनड्राईव्ह आहे. या नेत्याला सत्ताधारी संरक्षण देणार का? असा सवाल विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

माजी खासदार असलेले किरीट सोमय्यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओ असलेला पेनड्राइव्ह विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज विधानपरिषद सभागृहात सभापतींकडे सादर केला.

तसेच याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी दानवे यांनी सभागृहात मागणी केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर यांच्या महाराष्ट्रातील संस्कृतीला काही राजकारणी छेद देण्याचा प्रयत्न करत आहेत. महामंडळांवर विविध पदांचा प्रलोभने दाखवून,

ईडी, सीबीआय सारख्या यंत्रणांची भीती दाखवून काही महिला अधिकाऱ्यांना धमकी देऊन त्यांची पिळवणूक व शोषण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप दानवे यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर केला आहे.

सदर पेनड्राइव्हमध्ये मराठी स्त्रियांविषयी अश्लील भाषेत संभाषण आहे, या विषयी तपास करावा. मराठी महिलांविषयी अशा शब्दांत संभाषण करणारे किरीट सोमय्या हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रद्रोही आहेत, अशी टीका दानवे यांनी केली आहे.

तसेच या पेनड्राइव्हचे अवलोकलन करून कारवाई करण्याची मागणी अंबादास दानवे यांनी सभागृहात लावून धरली.

त्यावर उत्तर देताना गृहमंत्री यांनी या गंभीर प्रकरणाची सखोल वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

सोमय्यामुळे अनेकांचे वैयक्तिक आयुष्य उध्वस्त - अनिल परब

सोमय्या यांच्या त्या कथित व्हिडिओची सत्यता समोर आलीच पाहिजे. त्यांच्या या कृत्यामुळे अनेकांचे आयुष्य उध्वस्त होत आहेत. राज्य सरकारने यावर कारवाई केली पाहिजे. ही विकृती महाराष्ट्रासमोर आली पाहिजे. या प्रकरणावर कोणतीही चौकशी लावा पण सत्यता समोर आणा. अशी मागणी शिवसेना (उबाठा) गटाचे अनिल परब यांनी केली.

हा व्हिडिओ खरा असल्याचं सोमय्या यांनी अप्रत्यक्षरित्या मान्य केलं आहे असा दावासुद्धा अनिल परब यांनी विधानपरिषदेत केला आहे.

सोमय्या प्रकरणावर फडणवीसांचे उत्तर

अनिल परब आणि दानवे यांनी मांडलेला प्रकार खूप गंभीर आहे. याप्रकरणी अतिशय सखोल चौकशी केली जाणार आहे. कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, तुमच्याकडे तक्रारी असतील तर त्या आमच्याकडे द्या आम्ही त्यावर चौकशी करू असं गृहमंत्री देवेंद्र फडणीस म्हणाले आहेत.

Tags:    

Similar News