प्रवक्त्याला भाषा सांभाळून वापरण्याचे आदेश : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना इडी ने अटक केल्यानंतर मातोश्रीवर महाराष्ट्राचे प्रवक्त्यांची बैठक बोलावली. या बैठकीत महाराष्ट्रातील प्रवक्त्यांसह आमदार अंबादास दानवे, मनीषा कायंदे, सचिन अहिर खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत इत्यादी उपस्थित होते... उध्दव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यानंतर माध्यमांसमोर कोण बोलणार याबाबतीत अद्यापही कोणताच निर्णय घेतला नाही. पण महाराष्ट्रातील प्रत्येक प्रवक्त्याला भाषा सांभाळून वापरण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.;

Update: 2022-08-03 12:39 GMT


शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना इडी ने अटक केल्यानंतर मातोश्रीवर महाराष्ट्राचे प्रवक्त्यांची बैठक बोलावली. या बैठकीत महाराष्ट्रातील प्रवक्त्यांसह आमदार अंबादास दानवे, मनीषा कायंदे, सचिन अहिर खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत इत्यादी उपस्थित होते... उध्दव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यानंतर माध्यमांसमोर कोण बोलणार याबाबतीत अद्यापही कोणताच निर्णय घेतला नाही. पण महाराष्ट्रातील प्रत्येक प्रवक्त्याला भाषा सांभाळून वापरण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.


प्रवक्त्यांची बैठक संपल्यानंतर अरविंद सावंत या बैठकीतून बाहेर पडले. त्यांनी शिंदे गटावर सातत्याने काही भोंगे बोलतात. वाईट भाषेत बोलतात जे भाजपला मान्य आहे असं समजायचं का असे त्यांनी शिंदे गटावर टीका केली.

संजय राऊत यांनी मध्यंतरीच्या काळात भाजपवर सडकून टीका केली. त्यामुळे प्रत्येक प्रवक्त्याला भाषा जपून वापरण्याची मार्गदर्शन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

त्यानंतर शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यादेखील प्रवक्त्यांच्या बैठकीत उपस्थित होत्या. त्यांनी देखील पक्षाच्या संदर्भात माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली काल उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाला माध्यमांनी उदय सामंत यांच्या हल्ल्याबद्दल विचारले असता मेरी बिल्ली मेरे को म्याऊ असाच टोमणे त्यांनी उदय सामंत यांना मारला. त्यांनी शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद केला परंतु हे कार्यकर्ते माझ्यासोबत काल स्टेजवर उपस्थित होते अशी भूमिका शिवसेनेचे उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मांडली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांना आता टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

त्यानंतर उदय सामंत यांच्यावर हल्ला झाल्यानंतर, अब्दुल सत्तार यांनी हल्ल्याचे उत्तर हल्ल्याने देऊ अशी माध्यमां समोर वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्त्यावला सुषमा अंधारांनी अब्दुल सत्तार वर टीका केली मी कसा शिंदे यांचा निष्ठावंत आणि प्रामाणिक आहे हे दाखवण्याचा प्रयत्न सध्या सुरू होतोय मंत्रीपदासाठी हे सर्व सुरू आहे.

प्रवक्त्यांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांपासून ते बाकीच्या सर्व विषयांवर चर्चा केली. असे मत आमदार अंबादास दानवे यांनी मांडले पण कालच्या उदय सामंत यांच्यावर झालेल्या हल्यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.एखाद्या नेत्यावर हल्ला झाला तर त्याच्यावर कारवाई व्हायला हवी पण जी कलमे लावली गेली आहे ती चुकीचे आहेत सरकार सोड्याच्या भावनाने हे करत आहेत असे अंबादास दानवे म्हणाले,

केदार दिघे हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी जिल्हाप्रमुख पदी केदार दिघे यांची निवड करण्यात आली होती. त्यांच्यावर देखील खोटारडे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रवकत्यांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी आपल्या बैठकीत जास्तीत जास्त जनतेची कामे करण्याचे आदेश दिले आहेत.

Tags:    

Similar News