आमदार अपात्रतेप्रकरणी भाजपचा कावा ओळखा - यशोमती ठाकूर

Update: 2023-10-30 12:10 GMT

Mumbai : आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकराचं वेळापत्रक फेटाळलं आहे. नार्वेकरांवर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयानं ताशेरे ओढले आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सादर केलेल्या नव्या वेळापत्रकावरही सर्वोच्च न्यायालयालयानं आजच्या सुनावणीत नाराजी व्यक्त केली. तसेच, 31 डिसेंबरपर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिले आहेत. यावर आता काँग्रेसच्या नेत्या, आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांनी एक्स पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या की "शिवसेनेच्या फुटीर आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात दिरंगाई झाली आहे. निर्णय घेण्यासाठी होत असलेला विलंब म्हणजे सन्माननीय अध्यक्षांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून अपात्र आमदारांना दिलेलं संरक्षणच आहे. जनतेच्या मनातून हे सरकार कधीचंच पडलं" असल्याची टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे तर " मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जर अपात्र झाले तर अजित पवार यांनी त्यांची जागा घेऊ नये. भारतीय जनता पक्षाचा कावा ओळखावा, आणि सत्तेतून बाहेर पडावं. भारतीय जनता पक्ष फुटीर गटांना संपवणार आहे. एकनाथ शिंदेंनंतर अजित पवारांचा नंबर लागणार असल्याच सुचक वक्तव्य यशोमती ठाकूर यांनी केलं आहे.

Tags:    

Similar News