ठाकरे सरकारला किरीट सोमय्यांचा इशारा, घोटाळेबाजांवर कारवाई होईपर्यंत मागे हटणार नसल्याचा पुनरुच्चार

Update: 2022-04-12 07:16 GMT

INS विक्रांत प्रकरणावरून किरीट सोमय्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सोमय्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यातच किरीट सोमय्या देशाबाहेर पळाल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. दरम्यान किरीट सोमय्या यांनी व्हिडीओ ट्वीट करत ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. (Kirit Somaiya in trouble)

किरीट सोमय्या यांनी INS विक्रांत वाचवा मोहिमेच्या माध्यमातून जमा झालेले 58 कोटी रुपये मुलाच्या कंपनीत वळवले असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत (Sanjay raut) केला होता. त्यानंतर निवृत्त जवान बबन भोसले (Baban Bhosle) यांनी किरीट सोमय्या यांच्यावर ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान किरीट सोमय्या यांनी वकीलामार्फेत अटकपुर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने किरीट सोमय्यांचा (Kirit Somaiya ) जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. दरम्यान किरीट सोमय्या देशाबाहेर पळाले असण्याची शक्यता संजय राऊत यांनी व्यक्त केली होती. मात्र सोमय्या यांनी व्हिडीओ ट्वीट करून ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. (Kirit Somaiya tweet)

INS विक्रांत युध्दनौका वाचवण्यासाठी किरीट सोमय्या यांनी पैसे गोळा केले होते. मात्र ते पैसे राजभवनला जमा न केल्यामुळे किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरून राज्याचे राजकारण तापले आहे. दरम्यान किरीट सोमय्या हे देशाबाहेर पळाले असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्याला किरीट सोमय्या यांनी व्हिडीओ ट्वीट करून प्रत्युत्तर दिले आहे. (Kirit somaiya tweet a video)

सोमय्या म्हणाले की, 2013 साली राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार होते. त्यावेळी त्यांनी INS विक्रांत ही युध्दनौका भंगारात विकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर ही युध्दनौका वाचवण्यासाठी आम्ही प्रतिकात्मक निधी गोळा केला होता. तर या प्रकरणी भाजप शिवसेना या दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या शिष्टमंडळासह राज्यपाल व राष्ट्रपतींची भेट घेतली होती. तसेच यामध्ये फक्त 11 हजार रुपये निधी जमा झाला होता. मात्र संजय राऊत यांच्याकडून 58 कोटींच्या निधीच्या कंड्या पिकवल्या जात आहेत. मात्र किरीट सोमय्या ठाकरे सरकारच्या घोटाळेबाजांवर कारवाई होईपर्यंत मागे हटणार नसल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

Tags:    

Similar News