किरिट सोमय्या याचं किशोरी पेडणेकर यांना पुराव्यांसह उत्तर, म्हणाले किशोरीताई हे प्लॅट कुणाचे?

Update: 2022-03-03 09:32 GMT

मुंबई महापालिकेच्या तोंडावर भाजप शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील सदनिका हडप केल्याचा गंभीर आरोप केला होता.

यावर उत्तर देताना पेडणेकर यांनी किरीट सोमय्या यांनी त्यांच्याकडे असलेले फ्लॅट मला द्यावेत भावाकडून बहिणीला भेट दिली जाते. त्याप्रमाणेच किरीट भावाने मला त्याच्याकडील फ्लॅट द्यावे. असं म्हणत आरोप फेटाळले होते.

मात्र सोमय्या यांनी आज दिल्ली येथे पेडणेकर यांनी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील सदनिका हडप केल्याचा पुन्हा एकदा आरोप करत पेडणेकर यांच्या निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर पेडणेकर यांचा पत्ता दाखवत हे घर कोणाचं असा सवाल केला आहे. या प्रतिज्ञापत्रावर पेडणेकर यांचा पत्ता गोमाता नगर, बिल्डिंग नंबर 2, फ्लॅट नंबर 601, जे के मार्ग वरळी लोअर परेल असा दाखवण्यात आला आहे.

यावरून सोमय्या यांनी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या संदर्भात आमचे दिल्ली प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी किरिट सोमय्या यांच्याशी केलेली बातचीत

Tags:    

Similar News